कादोड - onevasai.com · सलात सलात ढोरखईत गॅलॅ....

16

Upload: others

Post on 22-Mar-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • कादोडी नाताळश्या हनाव ववशेषाांक

    २५ वडसेंबर २०१८

    सांपकक / अविप्राय :- आमश्या हरी संपर्क र्र् यार्रतान नातॅ

    आपला या अंर्ाविषयीसा मत, संपादर् मडंळाश्या रु्नालाही भटॅॉन

    जरूर र्ळिा.

    सूचना:- ‘र्ादोडी’ या अंर्ात तमुाला लेख, र्विता आहा र्य द्यासा हायद ॅतॅ [email protected]

    याओरती धाडा नातॅ संपादर् मंडळाला भेटा.

    जर्लॅ जावहरातदार, दनेगीदार तहसॅ बरा-िाईट मत दनेार् या जर्ल्या रु्पारी लॉर्ांअ ॅ आमॅ खपू आभार मानत्याि.

    नाताळसॉ हन सब्बान कुपार याांना खुब आनांदाव आन मजॅऑ जाओ अह्यो शुिेच्छा.

    या अांकात .......

    संपादर्ीय

    गरॅ..! पासरू्ार्ा, समदा बदालला बग ! – झजु्या तसु्र्ान

    नाना र्ार्ा - क्लेमेंट वडमेलो

    गाडा जर्ला – इनास तसु्र्ान

    रु्पारी आरक्षन - डॉ. ररबेर्ा दोडती

    एर् वनरोप पाठव्योतॉ – सॅबी परेरा

    मस्र्त - मुबंई ईिान प्रिास !! – नेल्सन वडमलेो

    पातेरातसॉ शा आन मार्डे – वमल्टन वडर्ोस्टा

    आध्यावमर् तयारी - राज फरगोज

    अस्तॅ..! अस्तॅ...! - रचना रॉविक्स

    र्विता - वलसा तसु्र्ानो

    वशमाऑ इटंरव्य ू- वसमसन रॉिीग्ज

    पोरी – विज ूिाझ

    बय - रॅ्रल वडर्ोस्टा

    सांपादक

    विस्तोफर ररबेलो (९८१९४३६०७८)

    सहसांपादक

    एडिडक वडसोजा सनुील बा. वडमेलो

    सांपादक मांडळ

    सायमन रॉविग्ज

    तेरेजा वडसोजा

    जेम्सन वडमेलो

    डॅवनयल मस्र्रणीस

    रॉबटक फनाांवडस

    राजन वडमेलो

    रॉवबन्सन वडमेलो

    िॉल्टर तसु्र्ानो

    मुखपृष्ठ :- पॉल वडमलेो, गास Email :- [email protected]

    Web :- www.onevasai.com

    मुद्रक :- मनॅ्यएुल वप्रंट, िसई पिूक – ९७६५८७४४९३

    या अांकात प्रवसद्ध झालेल्या मताशी सांपादक मांडळ सहमत हायदसॅ आहा नाय.

    सातिा िहरी एरू्न चौदािॉ अंर्

    खाजगी वितरन

    mailto:[email protected]:[email protected]://www.onevasai.com/

  • आरक्षन - एक वचांतनाव ववषय

    जर्ल्यांना नाताळश्या हनायो खबु खबु सबेुछा.

    सद्या आरक्षन प्रर्रन गाजता हाय.. सरर्ारी नोर्री आन वशक्षनसंस्था यामीनॅ आत्तसॅ ५१% आरक्षन हाय.. त्यात बी

    अजनू मराठा आरक्षन १६% िाडनार.. मजं ॅरेले फक्त ३३%. त्यात बी धनगर, िडार, मवुस्लम, ब्राह्मन लोर् बी आरक्षन मांग्या

    लागल्यात, थॉडक्यात आपनु आतॅ सरर्ारी नोर्रीबद्दल अपेक्षा न रे्लेली बरी...

    सरर्ारी बोठे्ठ सायेब (IPS , UPSC ) यामीनॅ आपला लोर् नाय. रु्ित आहोन पन आपले पोरे या भानगडीत पडले

    नात. पन आते त्या दृष्टीनॅ सद्या वशवबरे वबबीरे हॉया लागल्यात. पन एरं्दरीत दीहॉन वद अवधर्ारी िगाकयो जागा र्मी हॉया

    लागल्यात आन िर यी आरक्षन िाडला तॅ यामीनॅ पन आपल्या पॉरांना र्ॉडा र्ठीन र्ॉवम्पवटशन हाय यी वदखॉन येतॅ...

    आपनु एर् िळे सरर्ारी नोर्री हॉडॉन दिे पन वशक्षनसंस्थेमीनॅ जा आरक्षन िाडद ॅता जास्ती वचंताजनर् हाय. आरक्षन

    दओेन रेलेल्या ३३% मीनॅ बी मनॅेजमेंट र्ोटा िगैरेे आलॉस. मजं ॅओपन रॅ्टॅवगरीर्रता फक्त २०/२२% जागा ऱेल्यो. मार्क

    आन गणुित्ता अहॉनपन आपल्या पॉरांना पाय तडॅ अ ॅडवमशन वमळनार नाय. आन आपल्याला िाटॅद ॅआपल्यो रॅ्थॉवलर्

    वशक्षनसंस्था हात तडॅ आपल्याला मायनॉररटीमीनॅ जागा वमळद,ॅ तर यंदाश्या िहरा १३ िी वरं्िा ११िी इवंजनीयररंगश्ये र्ॉलेज े

    लेट सरुु जाले र्ारन राज्य सरर्ारला या मायनॉररटी र्ॉलेजमीनॅ अनसुवूचत जातीर्रता सीट पात आन ता प्रर्रन न्यायप्रविष्ठ

    होता... सरर्ारी वशक्षन संस्थेई िाट लाविल्योर आतॅ सरर्ारी अनदुान अहलेल्या मायनॉरीटी वशक्षणसंस्थेओर याि ंडॉळॉ हाय

    आन आज ना उद्या तडे पन ये घसुनार यात शरं्ा नाय... मजं ॅआज ना उद्या आपल्या पॉरांना तडे पन अ ॅडवमशन वमळना

    मवुश्र्ल हॉयद.ॅ..

    मजं ॅसिकसामान्य माहानाला आपल्या पॉरांमीनॅ गणुित्ता हॉिॉनसधु्दा लाखो रुपय खचक र्रॉन प्रायव्हटे इवन्स्टट्यटू मीनॅ

    वशक्षन दनेा भाग हॉयद ॅआन आवथकर्दृष््टया ता त्याला र्ॉडा परिाडद ॅयायी शरं्ा हाय. (आज बर्यास लोर्ायी आपली

    आयषु्यभरायी सगळीस वमळर्त आपल्या पॉरांआ यएूस नातॅ यरुोपशा MS शा २५ ते ४० लाखाआ खचाकपायांन पनाला

    लाविले). र्ायीर् लोर् अजनू बोठ्ठापन वमरव्याशास मांग ेआथ. घराला ओडे खपविले, पोरा पोरीआ र्ोमसार, लगीन प्रोग्रामला

    ओडे लोर् आल,े ऑडयाई दारू हाडलोती, अमरु् अमरु् मेन ूऑथॉ यायोस गोष्टी.

    थॉडक्यात यॅनारॉ र्ाळ वशक्षना आन सरर्ारी नोर्र्याआ बाबतीत आपल्या र्रता र्ठीन र्ाळ हाय आन आपली

    गनुित्ता िाढिॉन र्ॉवम्पवटशन मीनॅ उबा र्या र्रता आपल्या पॉरांना आपल्याला तयार र्र्या लागदॅ.ॅ.. त्यार्रता पालर्ाई चोर्स

    रेला पाय पन सद्या तरी ती जाणीि आपल्याला जालेली वदख ॅनाय...

    मडंळी, आपलॉ रु्पारी समाज रु्हन्यास गोष्टीत माग ॅनाय, आपल्या समाजानॅ खबु प्रगती रे्ले, २०१२ ला आपलॉ

    पयलॉ अरं् वनंगालॉ, त्यानंतर खबू बदल जालॅ, त्यात एर्ा निीन र्ायकक्रमाई भर पडले, ती मजं ॅ“र्ादोडी माई र्ितीर्ाई” यॉ

    र्ादोडी र्विताऑ र्ायकक्रम, त्या वटमला खबु खबु सबेूछा. पयलॉ अरं् प्रर्ावशत जालॉ त्या िहारा तीन मयन्याला एर् अह ॅअरं्

    वनंगातॉत ॅऑडा लोर् लीवितॉता आतॅ िहराला एर् अरं् वनंगातॅ. आपनु आपल्या भाशते बॉल्या लागले पन वलखान र्मी जाला

    आहा िाटातॅ, फेसबरु्-व्हॉटसअप िर वलखान र्रनारे हात तहसे या सोशल मीवडयाि िापर न र्रनारे पन हात. तमु ॅर्ागदोर

    लीविलॅला तमुसा वलखान आमश्या दरी धाडला तॅ आम ॅता टाईप र्रॉन आपल्या या अरं्ात दिे ूशर्ात्याि, आपली भाशा

    वलवखत स्िरुपात िाडव्या र्रता र्ादोडी संपादर् मडंळ आपल्या पाठीशी हाय आन मदतीला पन हाय. भगनू वलिीत र् या आन

    आमश्यापोत पॉसिा. आपल्या समाजायी अहीस प्रगती होत रेिो आन आपली संस्रृ्ती वटर्ॉन रेिो ई सवदछा.

    आपल्या जर्ल्यांना परत एर्दा नाताळश्या हनायो खबु खबु सबेुछा.

  • गरॅ..! पासूकाका, समदा बदालला बग ! – झजु्या तसु्र्ान, बोरीिली

    आपलॉ ंसमाज पार बदलॉन गॅलॉ ंबग. आतॅ समाजात बक्र्ाळ पैसॉ आलॅ. एरे्र् बंगलॅ र्ा, दापडॅु शार शार गाड्यो र्ा, र्य विसरॉस नार्ा. आतॅ तूआस बग ना, तू आंगोर डाग पडलेले चड्डी-गंजीफ्रोर् घालॉन लॉर्ाआ िाडीशे (सॉरॉन) खॉल्ये

    र्ाप्यासॉ आन मुंबयला घॅऑन जासॉ. (त्योरनॅस नाय गा, मॅ ‘व्हाय वधस खोल्यािरी खोल्यािरी दी..’ ऑ गांनॉ रशीलतॉ, आठिातॅ

    आ?) आतॅ, तुऑ रुबाब र्ा बग्यासॉ. डोख्योर पांडी टोपी र्ाय, (अदन््ये मदन्ये आपल्या तरुण पॉराई रॅ्लॅल्या र्ायकक्रमात तू लाल

    टोपी घालॉन वमरिाता, ता िॅगळा), ईस्त्रीआ र्वमज आन घडी न मॉडलॅला पोन्या. बाप्पा! बाप्पा! गरॅ, र्ा सॉबाता तू ! भगूनूस हांगातॅ,

    जर्ला बदलला बग.

    पान, मॅ र्ा हवंगतोतॉ, ए हतॅाभाटात बांवदलॅलॅ भॉठे भॉठे बंगलॅ ओशीर् पडलॅलॅ वदखात्यात. गरॅ पासरू्ार्ा, एर्तॅ या बंगल्यात रु्नसू

    नाहत्यात र्ारन पोरेबाळे वहर्ॉन बारगािात नोर्रीला जात्यात आन नंतर तडेस रेत्यात. डोर्रे दादी-बाबा आहात्यात-नाहत्यात.

    आन, जडे रु्टंुबे आथ, तडे बय-बाबाई व्यिस्था वजन्याखाला रे्लेली आहतॅ. वबशारे पोरेपारे र्ामादधं्यात ओबडे गुतलेले आहात्यात

    र्ी घर बांदताना आपल्या डॉर्र् या आयबापाना िेगळी खोली र्ाड्यादो भाऑन जात्यात बग, र्ा र्रॅसा?

    पयलॅ आपलॅ रु्टंुबे नोर्री आनी हतेीओर सल्याशे बग. आतॅ आपले पोरे िॅगिॅगळ्या दधं्यात पडल्यात. वबवल्डंग लाइनवमनॅ

    र्ोडॅ जान पुडॅ आल्यात. रॅ्टरींगवमनॅ पान आपला लोर् पुडे आथ. तॅ समाजाई खा-प्यावगरी परुिीत्यात. त्याना सिदार चाइवनस-

    फायनीस खा घालत्यात. पासरू्ार्ा, पान माला िाटातॅ आपल्या पॉराई खान्योर बंदान ठोव्या पाय. या लान्या लान्या पोरपोरीये पडेु

    आलेले पोटे बवगले गा, बरा नाय िाटॅ. लानपनी ऑखांदा ऑडा खाला ना, गा भोठेपनी वजव्याऑडा ऑखांद खा लागे नाय, इ तॅ

    लक्षातूस घॅत नात. गरॅ, आपल्यािखत ता वतखाट हुक्या बुंबला जीिान, डोंगरशी मािटी, िाला गॉळ्याई भाजी; नसुता नाि र्ाडला

    तरी तॉडंाला पानी हुटातॅ. आत्याये पोरे तॅला ‘बलुशीट’ बॉलात्यात आन रस्त्योरसा ‘जंर्फूड’ खात्यात. र्ा र्रॅसा हांगू?

    तह ेआपले पोरे वहर्ॉन बॅताम पडॅु गेल्यात, ई बार्ी खरा हा. जगाश्या जर्ल्या दशेात आपले तरुन र्ामाला आथ बग. अडे

    जे आथ, ते पान र्य र्मी नात. परतेर् गािागािात वहरॅमानरॅ् आथ. आपले पोरे खॅळात पडेु आथ, र्लािंत र्ॉडॅ आथ, लेखर्-

    र्िी तर विसरॉस नार्ा. गदीत एर् दगड मारलॉ आन तॉ जॅला लागॅद ॅतॅला विसारला तर तॉ वर्िा ती हांगॅद ॅमॅ लीवितॅ.

    गरॅ! तुआ गायी हायदसॅ, पैसॉ बक्र्ाळ जाल्यानॅ आपला लोर् बारगािात तीथकयाते्रला जात्यात. यात्रा पवित्रभमूीई र्रत्यात,

    पान ‘तीथक’ मात्र ड्यूटीफ्री मीनसा घॅत्यात. आतॅ विर्ास बोयलॉ वमंजे तॉ ऑहॉ पन ऑथॅ, बग.

    नाना काका - क्लेमेंट वडमेलो, जितळा

    उजाडलॉता. नानार्ार्ाआ घराऑ असनॉ लांबॉ ऑटॉ, ररर्ामॉस वदखातोतॉ! जॉहॉ पडदॉ उगडलॅ आन स्टेज ररर्ामा हाय! दोन शार र्ोंबड्यो ओट्योर अडेतडे वफरातोत्यो आन नानार्ार्ाई एंट्री जाली. डोख्योरशी र्ाळी टोपी खाजवित तॉ

    आतवमनसॉ बायार उतारलॉ, ओट्योरशा बलर्ािा मॅरॅ घट ऑथॉ (साउळ दळ्यासा जाता) त्या घटोर एर् र्ोंबडी बेहलती.

    नानार्ार्ा वतआ मॅरॅ जाता खोटी, वतन ॅजा हुरान मारला ता बाजशूा दमूा ओट्योर. नानार्ार्ा घटोर जाऑन बॅहलॉ. तॅनॅ वबडी

    पेटविली. दोन घोट घॅतलॅ आन आंगळॅतनॅ जानार् या यानार् या लोर्ोर बवगत नार्ातााँडातनॅ धॉर र्ाड्या लागलॉ. नानार्ार्ा वमनज ॅ

    माहा वबलंदर माहन!ु िईशे जपाळे, जायफाळे हांगॉन मूंबयशा वगरार्ाला विर्नारॉ आन हाय हाय तॉ त्यांना फशविनारॉ! एर्दा

    नानार्ार्ानॅ तुळशी माड्याई फांदी, िािळीत माती घालॉन, त्या मातीत भोसवर्ली आन वगरार्ाला तुळशी माडॉ हांगॉन विर्ीली.

    वतहरॅ वदहा ती मेलेली फांदी घॅऑन वगरार् आला. तॉहॉ नानार्ार्ा तॅला हांगातॅ, "सायब, आजर्ाल माणसांचा भरिसा नाय रायला,

    हाय हाय ति माणसू मरतो. हा तर तुळशीचा माडा त्याचा जीि रे्िढा!"

    ऑहॉ िस्तार् नानार्ार्ा आज ओट्योर बॅहल्या बॅहल्या आंगळ्यातनॅ जानार् याअ ॅनार् या लोर्ोर टर्मार् बवगतोतॉ. घारा

    पडुशा बाइमॅरॅ, भेंडीआ झाडोर र्ागुळॉ बॅहलतॉ तॉ पान मान िार्डी र्रॉन, आंगळ्यात वपलोटे घॅऑन र्ोंबडी सरातोती तीओर

  • डॉर्ायतोतॉ. ऑड्यातनॅ घाबरॉघबुरॉ जाल्यालॉ फरशा वलपल्या पायाय, भाटात गॅलतॉ तडनॅ आलॉ आन नानार्ार्ा ओट्योर सडलॉ.

    नानार्ार्ा वबडी पेतोतॉ, त्या वबडी तााँडाला र्ाळी र्ोजळी जालती ती तॅनॅ वजभीओर मारली. वबडी पडुशी र्ोजळी खाशी तॅला

    हव्िय ओथी. अही र्ोजळी खाऑन खाऑन त्या वजभी बोथी र्ाळी पडलोती. तॅनॅ हातशी वबडी आंगळ्यात टावर्ली आन

    भेंडीओरशा र्ागुळ्या घती मान वतरपी र्रॉन फरशाला विसारला, "र्रॅ फरशा, घाबरॉ साबरॉ जाल्या तॉ?" फरशानॅ नानार्ार्ा मॅरॅ

    बडु टेवर्ला, "नानार्ार्ा, वजिाला घोर लागलॅ, मान फाशात अडर्ाले," फरशा. "आरॅ, र्ा जालॅ ता तरी हांग" नाना. आन फरशानॅ

    बॉलॅदो सरुिात रे्ली. "नानार्ार्ा, रॅ्नरा बाँरे्आ सायबानॅ आठ वदहाशी मदुत वदले. नाय पैशॅ भरलॅ तॅ गॉठ्याशी भय हॉडॉन नेनॅ अहॉ

    दम वदलॅ!" आहा बॉलॉन फरशा, नानार्ार्ा तोंडोर अहॉ डॉरॅ् लागलॉ. जहॉ अ ॅखादॉ माहन ुवजऑन वमंगारा आशव्यादो उतारलॉ गा,

    वमंगारसा अ ॅखादा रु्त्रा त्या आशविनार् या माहना तोंडोर, मान िार्डी र्रॉन, तााँड उगडॉन, वजभ बार र्ाडॉन आशान डॉर्ायतॅ तहॉ...

    सरर्ारनॅ शेतर्र् यांना सबशीडी वदलती, भय विर्त घ्यादो. सरर्ारनॅ एर् योजना हाडलोती. अद ेपैशॅ सरर्ारशॅ आन अद े

    शेतर्रॅय. फरशानॅ पान फॉमक भरलोतॉ, आन तॅला पशॅै वमळालतॅ. पान तॅआ पैशाई तॅनॅ भय न हाडता, पैशॅ पोरी लग्नात उडविलतॅ आन

    आतॅ नोटीस येता खोटी तॅया धाबॅ दनानलोतॅ!.. नानार्ार्ानॅ डॉखा खाजविला, "उपाय हाय! तूआ आख्खा र्जक माफ हॉयद ॅऑहॉ

    उपाय हाय. माला र्ा ददेा बॉल?" नाना. फरशा हांगातॅ, "नानार्ार्ा तुला पािशेर पाजीनॅ. नानार्ार्ानॅ भेंडीओरशा र्ागुळ्या घतीन

    फरशोर िार्डा बवगला. "मायला, तुआ फरशाइतॅ! आख्खी भय वगळली तू! डख्खर पान वदलॉ नाय आन आतॅ ती पसली नाय तॉहॉ

    तू मा दरी आलॉ. म ॅतुला आतॅ योर उपाय हांगॅसॉ आन तू माला फक्त पािशेर पाजॅशी? तुला र्ा िाटला.. नाना बयतॅ जालॅ, भयतॅ

    नाय" नाना भडर्ालॉ तह ॅफरशानॅ पासशे रूपय दसॅा र्बलू रॅ्ला. मंग नानानॅ तॅआ र्ानात र्यतरी हांवगला. फरशा जाम आहालॉ

    आन तुमान पाखडीत पायरीओरनॅ उतारलॉ.

    तॅला आठदी भरॅत गनाय, तॉडॅत हार्ोबोटशा पाराय, फरशा धािात धािात नानाआ घारा आलॉ. तॅनॅ नाना र्ानात र्य तरी

    हांवगला.. नानानॅ तॅला अ ॅळॉ आन वपशिी घ्यादो हांवगली. दोगी सॉप्पट वनगालॅ... बस्तुल्याआ रे्ळीतनॅ वखरलॅ आन दगेूआ

    र्ार्ड्यातनॅ खाला वहिारात उतारलॅ... सलात सलात ढोरखईत गॅलॅ. समोर पासईू भय मरॉन पडलोती. नानानॅ फरशाला डॉळॉ मारलॉ.

    फरशा अ ॅळॉ घॅऑन पडॅु जालॉ.. नानानॅ हांवगल्या परमानॅ फरशानॅ येळी घॅऑन भयसॉ र्ान र्ावपलॉ, नानानॅ तॉ खॉल्यात गुंडाळलॉ

    आन फरशा हातशी र्ापडाई वपशिी घॅऑन तॅआ वपशवित तॉ भयसॉ र्ान टावर्लॉ... र्ाम फत्ते्त जाल्योर, दोगी भाटातनॅ िर सडलॅ

    आन रस्त्या लागलॅ... सलात सलात एर्दाशॅ रॅ्नरा बाँरे्त पोसलॅ.... दोगी, सायबा रे्वबनशा बार बॅहलतॅ. फरशाआ व्यांगॅत वपशिी

    ओथी. सायब रे्वबनशा र्ाशीतनॅ डॉर्ािलॉ, फरशा व्यांगॅशी वपशिी बगॉन तॅला बरा िाटला. या पडुनॅ, सायबानॅ भयसा र्जक पास

    रॅ्ला पाय भगून फरशानॅ यास वपशवितनॅ सायबार्रता िेलशीए रे्ळे, र्तॅ भयसॉ पहुु, र्तॅ दारुई बाठली हाडलोती.

    बाँरे्आ सायबानॅ दॉगाना आतवमनॅ बोलविला. नाना आन फरशा दोगी र्ाशीऑ दरिाजॉ लॉटॉन सायबा रे्वबनीत वखरलॅ.

    सायबानॅ पयली फरशा हातशी वपशिी घेटली. फरशा दते नॉतॉ, तरी सायबानॅ बळजबरी र्रॉन ती वपशिी फरशा िाँगॅतनॅ खेशीली आन

    टॅबलाऑ खन उगडॉन, तॅआ खनात ठोविली आन िर बी हांगातॅ, "फरशार्ार्ा, तुमाला वर्ती िेळा सांवगतलं अशा भेटिस्तू लपिनू

    आणायच्या असतात, र्ोणी पावहलं म्हणजे!" आन तॅनॅ खन बंद रॅ्लॉ." हा, बोला र्धी भरता तुम्ही र्जक?" सायबानॅ आहा बॉलता

    खोटी फरशानॅ रड्या सरुिात रे्ली. नानानॅ फरशा पाठीत थॉपट्यादो सरुिात रे्ली. नाना हांगातॅ, "सायब, फरशाची म्हसै मेली." फरशा

    अजनू जॉरात रड्या लागलॉ. "ह ेबघा, मला नर्ा मखुक बनि.ू माझी तीस िषाकची नोर्री झाली. तुमच्यासारखे हजार लोरं् बवघतली

    आहते. म्हसै मेली याला परुािा र्ाय?" "साहबे, परुािा तुमी टेबलाच्या खणात ठेिला आह.े"

    नानानॅ आहा बॉलता खोटी सायबानॅ खाडर्न टॅबलाऑ खन उगडलॉ आन खनाशी वपशिी र्ाडॉन टेबलोर पाखडली. तॅ

    वपशवितनॅ मलॅ्या भयसॉ र्ान खाला पडलॉ. सायब ताडर्ान खवुचकतनॅ उडलॉ, तॅनॅ वखशातनॅ रुमाल र्ाडॉन नार्ोर धरलॉ. "पवहला हा

    र्ान येथनू उचला." सायेब. नाना हांगातॅ, "सायब, तुमाला परुािा पायजे ऑथा ना!" सायब हांगातॅ, "परुािा गेला खड्ड्यात...

    फरशाचं र्जक माफ.." सायबानॅ आहा हांगता खोटी फरशानॅ भयसॉ र्ान वपशवित भरलॉ आन फरशा ठॉठाईत सायबा रे्वबनशा बार

    पडलॉ. तॅआ मागोमाग नाना उठलॉ. नाना दरिाजॉ उगडॉन बाआर जाय, ऑड्यात सायबानॅ तॅला हार् मारली. "तुमचं नाि र्ाय हो?"

    नानानॅ भेंडीओरशा र्ागुळ्याघती मान िार्डी रे्ली आन र्ागूळॉ र्ोंबडी वपलोर बवगतॅ, तॉहॉ नाना सायबोर डॉर्ायलॉ. नानानॅ

    डोख्योरशी टोपी र्ाडॉन आथा धरली आन नाना जेम्स बााँडशा स्टाईलवमनॅ बोयलॉ "नाना.... नाना हांगातॅत लोर् माला!" आहा

    बॉलॉन नानानॅ टोपी डॉख्यात घायली आन धाडर्न दरिाजॉ उगडॉन बार गॅलॉ..! सायब नाना मांगी बगीत रॅलॉ!!

  • गाडा जकला – इनास तसु्र्ान, गाहा. .

    ‘गाडा जर्ला,’ र्ॉडॅआ आरामात आप ूऑ िाक्प्रचार िापरतॅि. या मांगसॉ इवतहास आपल्या गाइ हायदसॅ, तरी पन त्या

    बरबर थॉडॉसॉ विरंगुळॉ....

    पयलॅन आपले बाप-दादा गािड्या (पुिक-पट्टो) पॅडंॉ आढ्यादो जाशे. ते लोर् आपल्याला दोसत (मीत्र) बॉल्याशे. परती मीनॅ

    आप ूपन तॅना दोसतूस बॉलशॅे. पॅडंॉ आढ्या र्रता आपनू अडने गाडा (बैल-गाडी) घॅिॉन जाशे. आतॅ ऑड्या लांब जासा (३५/४०

    वर्मी.) मींजॅ तयारी नीशीस जा लागॅसा.

    मींज,ॅ जर्ला साजो-सामान हरी न्या लागातोता. तॅल, मीठा, मशालॉ, हूक्रॅ्-बूंबलू, साऊळ, रियशे िांगे, सयपार्ाला भांडे

    गाडा जक्यादो दोर. अहा जर्ला हरी न्या लागातोता. ता जर्ला अ ॅर्ा गूनीत बांदसॅा, तॅलास आपला लोर् # मािटी बॉलशेॅ. त्योरनॅ

    आपल्या भाशेत एर् म्हन पन हाय. #पािवटत मािटी. जर्ला सामान गाड्यात भरला गा मंग बैला आंगोर झलुी (रंगी-वबरंगी र्पडॅआ

    िार्ळी घतीन हीिीलॅला र्पडा)

    थोडक्यात बैलाओ सटू घालॅसॉ, आन िरती टाय, मींज ेगळ्यातशी घूंगरा माळीऑ पट्टॉ. अहा जर्ला तयार र्रॅसा.. त्योरनॅ

    बी एर् िाक्प्रचार प्रचलीत जालो. # गाडा हजला. मंग ई गाडा हजला गा र्ॉपात नींगालॅ गािड्या.

    गािड्या पेंड्याअ ॅ २ परर्ार ऑथे.

    १) मोजळे - मींजॅ मळनी रॅ्लॅल्या पॅड्ंयाए सादारन ९/१२ ईचंं व्यासाए ५ तॅ ७ आथ लांब रोल त्याला लोळी बॉलात्यात

    अह्यो २ लोळ्यो एिर्ाट नळाए (पेंड्या पासनूसू तयार रॅ्लॅलो ईचं बर जाडॉ, तीनेर् फूट लांबॉ दोर) बांदलेल्यो. िजान अंदाजे तीन-

    एर् र्ीलो.

    २)बस्रे् - वमंजे पॅडंॉ रोल न र्रता हूट्टॉस, पन रं्बरॅत आिळॉन बांदीलेली ८०० ग्रेम तॅ एर् र्ीलो िजनाई, ४ साडेचार फूट

    लांबीई शी जडुी.

    यात दोसत लोर् र्तॅ-र्तॅ र्ॉपात लोर्ांना गंडव्यासॉ प्रयत्न र्रतोतॅ. मींजे मॉजळ्या पोटात (गाब्यात) भखुाट पन भरॅशे. पन

    र्य शाने र्ॉपात राही मीनशॅ २/४ ठीर्ानशॅ मॉजळॅ र्ाडॉन खात्री र्रॉन मंगूस सौदॉ र्रॅशे. आन तॉस पॅडंॉ बैला पडॅू टाक्याशे. परत

    द्याशे नाय. एर्दा र्ा सौदॉ जालॉ गा मंग पॅडंॉ भरॅ सरूिात.

    शक्यतो गाड्याई १००/१२५ मोजळ्याई रे्पेसीटी. र्ारन गाडे पन हाट्याए (मजबतु आन रंूद)े अह्याशे. (त्योरनॅ आपल्यात

    एर् बॉलना पन हाय. एखांद बाई जरा जावस्तस जाडी हायद ेताँ तीला आप ूहाटॅआ गाडा शीडिीतॅि) गाड्यात पॅडंॉ मॉजॅशी पद्धत जाम

    अजब ओथी, तॅत माऑ बॉठ्ठॉ बाबा तॅ गजब ओथो. दोसत लोर्ाना १०० एर्दम मॉजता येत नोते. मंग १० मॉजळॅ गाड्यात भरले गा

    १ बाजलुा र्ाडॅसॉ, अह े१० मॉजळॅ बाजूला र्ाडलॅ गा १०० सा माप जाला.

    सादारन ७० एर् मॉजळॅ जाले गा बाबाला दारूऑ टूळपॉ यासॉ (अरे यासॉ र्डे, िाडगॅई नक्र्ल ती) मंग दॉस्तापा

    र्बजाआ खीशातनॅ नोट र्ाडॉन द्यासॉ, आन दारू आढ्या धाडॅसॉ, तॉ गॅलॉगा हळुसर्न मॅरॅ र्ाडलॅल्या १० शा मापा मींशे २/३

    मॉजळॅ. र्ाडॉन गाड्यात टाक्याशे. वमंजे आपोआप माप र्मी जाला. (दारू र्रता दीलॅलॅ पैशॅ व्याजा हगेाट परत)

    गाड्यात पॅडंॉ १२५ दोस्ता मापा परमानॅ. पन डोल दीख्यादो दीडशे-पािने दोनश्याि. दॉस्ताला र्तॅ सव्शय आलॉस, तॅ

    तॅलास सन्या झाडोर सडव्यासा, दादा तूमशॅ मॉजळॅस बॉठॅ्ठ हात. मस्त बांदील्यात..... मींजॅ दॉस्ताला # बोरीिरनॅ सडिॅसा आन

    हािरीयोरनॅ डॅिरॅसा.

    पॅडंॉ भरॉन जालॉ गा दॉराए फीट गाडा बांदॉन सूंदॉन घॅसा, शारी मॅरनॅ गाडा फीट र्रॅसा मींजॅ जक्र्ॉन घॅसा. यालास

    बोलात्यात “गाडा जर्ला......”

  • कुपारी आरक्षन - डॉ. ररबेर्ा दोडती, दोडतीआळी, वनमकळ.

    दमुा: गरॅ मर् या, रु्नबी लागल्यात, धनगरू लागल्यात, त्या वदहा मसूलुमान ूमोरच्यो घॅऑन गेलते.. आपल्या रु्पार् याऑस र्य बॉबंाट

    नाय तॉ.. आपल्या रु्नाला आरक्षन गा र्ा ता पा नाय िाटाते..

    मर् या: आरे दमुा, आरक्षन वमळ्यादो र्यतरी यार अहत्यात रॅ.. त्याई अहिालात हांवगला गा ९८.२३% मराठा समाजादरी वफ्रज आन

    मोबाईल नात.. आन ्उलटा आपल्या रु्पारी समाजात ९८.२३% लॉर्ांदरी आयफोन आन LGसा डबल डोरसा फ्रीज हाय आन ता बी

    convertible... आपल्याला रु्न आरक्षन दनेार हांग.ू..?

    दमुा: पन आप ूमोरच्यो तरी न्याि...

    मर् या: आरे नसुतॉ मोरच्यो नॅऑन सले नाय ना, घोशना द्या लागात्यात..

    दमुा: ऑडास ना... आमशी पशीबाय हाय ना... तीनॅ मतेस ला सुलीपडुन ॅहार् वदली तरी तॉ पळीतन ॅधािात घारा पॉसातॅ... पशीबाय

    एर्टी बास...पडॅु बॉल..

    मर् या: आरे पोवलसायो गाड्यो पॅटव्या लागात्यात

    दमुा: आरे तॅआ टेन्शनसू नाय... आमश्या मॅरदारशो शार बायर्ो दॉपारा िारत्याला बेहल्यो ना गा हांज्यादो आख्खॉ गाि पेटवित्यात... ता

    पन जाला समाज...

    मर् या: आरे पन माहने. आपला रु्पारी लोर् र्ॉडा हॉयसा... मनूबाबानॅ बेंबीआ दढॅातन ॅहार् मारली तरी हजारभर लोर् पन जमॅसा नाय...

    दमुा: ता त ूमािर होड...

    आरे रोट्याऑ पीठ मळ्यादो आन लोंगरॅ र्ाप्या भय्या येत्यात ना ते तआु मा पोरां बापसिाईन र्ादोडी जाल्यात... ते जर्ले हामटॉन

    हाडतॅ...

    दमुा: बास ऑडा अव्िाल जाला.. पन मोरच्यो न्यासॉ र्तॅ..

    मर् या: आतॅ त्यादो थांब्या लागे... आतॅ लग्नाऑ सीजन... बायर्ो पीठ मळ्याशा, तरने पॉराटे फोटोशटूशा आन गिाटे आंबॉ र्ाप्याशा

    र्ामात बीजी आथ.. आतॅ रु्त्रा नाय हापड्यासा...

    आपनु उपिासर्ाळातशी तारीख धरॉ (लोर्ांए तोंडे पन जरूूर् उतरलेले आहात्यात)... आन वहनिार धरॉ वमनजॅ आयटीिालॅ आन वटशर

    लोर् पन जर्ले घॅता येद्यात...

    दमुा: पन त ूअहिालात र्ा वलिनार?

    मर् या: आरे म ॅजर्ला ठरविलॅ... सरर्ारशी मसु्र्टदाबी र्रॅशी... गवनमी र्ािो िापरॅसॉ...

    दमुा: त ूनक्र्ी र्ा र्रॅ रॅ.? इ बग... फेलश्यानॅ महानगरपावलरे्आ टायमात पापलेट, रािस, हुरे्ळे, हळिॉ, गािठी, बायारशी जर्ल्याई

    लास दऑॅन बवगले. पन र्य िॅळा िळली नाय. त ूर्ा ठरविलॅ?

    मर् या: आरे फक्त अहिाल आईर् बास... मॅ डायरेर्ली इनडायरेर् र्ाम र्रनार.. आरक्षन न वदल्यास..

    मदु्दॉ एर्: रु्पारी समाजातील रु्न भगनू वटचर नातॅ डेंवटस्ट बनव्याश्या र्ारखान्यात अाँडवमशन घॅनार नाय (इवंजनीअररंग जर्ला आपलास

    हाय तॅतॅन त्याऑ पॅडंॉ पडलॅ).

    ई हांवगला गा सब्बान र्ााँलेजशे वप्रवन्सपल आन वडन सरर्ारला वमन्ित्यो र्रद्यात...

    मदु्दॉ दोन: रु्पारी समाजातील एर्ही व्यक्ती हााँटेललाईन नातॅ शीपिर र्ाम र्रणार नाय..

    ई हांवगला गा आख्खे हााँटेलिाले गारद.. आख्ख्यो कू्रज बोटी भाऊश्या धक्क्याला लागल्यो गा सरर्ार प्रेशरवमनॅ अ ॅनार...

    मदु्दॉ तीनः रु्पारी समाजातील वक्रम (आरे मॅल्या तरने पोरे रे) रु्नसू अमेरररे्ला जाणार नाय.. ई हांगता खोटी वसवलर्ॉन िाँलीतनॅ ट्रम्प

    तात्याऑ प्रेशर येनार... गा मंग आरक्षन आलास समाज..

  • आन याय पन नाय भागला तॅ....

    “एर् जर्ल्यात भोट्टी गलुली टाक्याशी गा आजपासनू रु्पारी समाजातशी एर्पन बायरू् वनंदा र्रनार नाय आन एर्पन गि दारु पॅनार

    नाय...”

    ई हांग्याशी खोटी बास गा डायरेक्ट िरनॅ 'लशुीफर' अ ॅऑन रु्पारी समाजाला आरक्षन द्या भाग पाडतॅ गनाय ता बग...

    एर् रु्पारी... जय रु्पारी

    एक वनरोप पाठव्योतॉ – सॅबी परेरा, भाटी नानभाट

    इ-मेल, एसेमेस, फेसबरु्, व्हॉटसअप इ जर्ला सरुू जालॅपासून रु्नाला र्य मेसेज नातॅ वनरोप धाड्यासॉ हायद ॅतॅ र्ाम

    एर्दम सॉप्पा जालॅ. पन र्य िहरा आदी इ र्ाम जाम वजवक्रआ ऑथा. अन ्तॅतशा तॅत लग्नार्रता हय-याि वनरोप धाड्यासॉ वमनजॅ..

    बाप रे बाप..!

    पोरानॅ पोरीला नातॅ पोरीनॅ पोराला (इ आवदस वर्वलयर रॅ्लॅला बरा, नाय तॅ स्त्रीमकु्तीिालॅ मा घारा मोशाक घॅिॉन याशे)

    डायरेक्ट लग्नाआ विसारला आहा र्रता यासा नाय. पॉरा अन पोरीआ घरशे एर्मॅर्ाला ऑळखात्यात हायद,ॅ देिळा-रािळा

    भटॅात्यात हायद ॅतरी वनरोप धाड्यादो एर् मध्यस्थ लाग्यासॉ.

    ऑ मध्यस्थ वमनज,ॅ गिात गि अन बायर्ात बायरु् ऑहॉ आहातॅ. परतेर् गािात नहलॉ तरी दोन शार गािा मननू एर्तरी

    आहातॅस. आपल्या फरगोजीत रु्नाऑ पॉर, पोरी िराड्याशी जाले, रु्नाआ र्डॅ हयरा हॉया लागलॅ, रु्नाआ हयरा हुट्या लागलॅ,

    रु्नाआ पॉराई अपेक्षा र्ा हाय, रु्नाआ बय बाबायी अपेक्षा र्ा हाय ई आख्खा विर्ीवपडीया तॅआ वपरविट्या खोवशलॅला आहातॅ.

    परतेर् घरशी बाई तॅई बाय, ियनी, मािशी नायतॅ रु्मारी आहतॅ. तॉ रु्नापन घारा डायरेक्ट सुलीपडॅु जािॉन पेटुल्योर बॅहॉन तॅआ

    घरशा बाई बरबर तासनतास िाताक र्रू शर्ातॅ. बायबल वमनॅ जॉहॉ गवब्रयल दतु ऑथॉ, रामायणात जॉहॉ हनमुान ऑथॉ, महाभारतात

    जॉहॉ संजय ऑथॉ आन समाजिादी पक्षात जॉहॉ अमरवसंग ऑथॉ, तॉहॉ ऑ मध्यस्थ आहतॅ. सातबा-योर तॅआ नाि फरसू, साल,ू

    मॉता, पास्क्या आहा र्यजरी अहला तरी तोंडोर तॅला र्ॉपात, रु्न्या ऑहॉ मान वदलॉ जातॅ अन पाठीमांगे "भारणीबाय" आहा

    वशडविला जातॅ. तॅला (आपनू सोयीर्रता तॅआ नाि फरस ूधरॉ) इ जर्ला मायीत आहातॅ पन तॅि तॅला र्य घंटा फरर् पडॅ नाय.

    हार्ोटे दऊेळशा िाटणी येताना र्ामीनॅ फरसलूा हांगीला "रु्न्या एर् र्ाम ऑथा, भाटशे आल्योर जरुुर् घारा अ ॅिॉन जा".

    र्ामीबाय भाटात जािॉन वनंदान-वटपान र्रॉन अर्रा िाज्यादो घारा आली. सलुीओर आंदान ठविला अन भाजीदो र्ापान-रु्टान र्रॅ

    लागली तॉड्यात फरस ूअ ॅिॉन सलुीपडॅु पेटुल्यािर बॅहलॅॉ. र्ावमनॅ हांगीला "रु्न्या मॅ ओडी भाजी तेलोर टार्ीतॅ ति तुमे पेटुल्या मांगे

    शा-पानी हाय तॉ घ्या. फरसलूा शा-पानी वमंजे र्ा, तो रु्हन्या बाठलीत र्डॅ ठविलेलॉ आहते, निटार्ा गलास र्ॉनाडात र्डॅ आहातॅ

    इ जर्ला आदीस गाइ हाय. तॉ बाठलीशी पांढरी, निटार्ा गलासात िाळॉन घॅतॅ, लॉनश्या बरणीत हात घालॉन २-३ रायआब्याय

    वशरी सर्ना मनून घॅतॅ अन पेटूल्योर बॅहॉन एरे्र् घोट मारीत मारीत र्ावमबाय र्ा हांगातॅ ता आयरॅ्आ लागतॅ.

    आपल्या पोराि सॉभाि, रूप, पगार, आपली जागा-जमीन, सलापसा घर अन पॉराय बारा िहराय बयबाबा ऑडा जर्ाला

    हांगॉन जाला, गा मंग ती रु्ना पोरीला वनरोप द्यासॉ ता हांगातॅ. इ र्ाम तुस र्हॉ र्रू शर्ता अन बी रु्नाला जमॅसा र्ाहा नाय इ

    हांगॉन फरसलूा जरा मस्र्ॉ मारतॅ. फरस ूजा वनगालॉ गा र्ावमबाय ओट्योर येतॅ. फरस ूपायरीिरनॅ डॅिता डॅिता हांगातॅ "र्ावमबाय या

    पायरीला जरा प्लास्टर र्रॉन जरा ऊश्शी र्र नाय तॅ मागश्या खॅपॅघती आमशी पायरी िरशी अन तूमशी पायरी खालशी भगुुन वनरोप

    परत यासॉ..!". आपल्यास जोर् िर हािात हािात फरस ूवनंगातॅ.

    फरस ूदरी वनरोप धाडलॉ वमनजॅ तॉ जाग्योर पॉसणार अन हा नातॅ ना र्यतरी अहो पन उत्तर अ ॅनार याइ खात्री आहातॅ. (र्तॅ

    र्तॅ ४०शा स्पीड वमनॅ गॅलॅलॉ वनरोप ८० स्पीड वमनॅ परत यासॉ, िर मा पोरीला वनरोप धाड्याशी वहमंत र्ही जाली ऑ दम, अन

    आपल्या बय बेनी माथ्या भरॅदो गाळीय ेफुले पन याशे) पण परतेर् िॅळा, परतेर्ाला फरस ूभटॅातॅस आहा नाय. मंग रु्नतरी नातेिाईर्

    नायतॅ वमत्राय पाय धरॅआ लागतॅत. तॉ आपलॉ वनरोप र्ॉहॉ पोशविद,ॅ पोशविद ॅगा वनरोप खायद,ॅ गा वमनश्या वमनॅ सिता िाप्याला

  • बंधना िाळद ॅइ हांगता यासा नाय. थॉडक्यात वमनजॅ र्तॅ फोन लागॅस नाय, र्तॅ एंगेज येतॅ, र्तॅ िॉप हॉतॅ, र्तॅ रॉगं नंबर लागतॅ, तॅ

    र्तॅ क्रॉस र्नेक्शन लागातॅ. अ ॅ आजर्ाल फोन वमनॅ अहलेलॅ जर्लॅ प्रॉब्लेम वतगाळा या वनरोपा वसस्टम वमनॅ पन ऑथॅ. असो.

    ताहा बवगला तॅ आगाय पासनू भईुगाि पोत आप ूरु्पारी जर्ले एर्मेर् पन र्य र्य पॅररश सॉताला भारी अन वबयांना

    हलर्ा समजातोतॅ (तॉहॉ, अजूनही घनॉ फरर् पडलॉ नाय) भगून हय-याि वनरोप, आपला पॅररश अन फारतर आजबूाजशेू एर्दोन

    पॅररश या पलीर्डे धाडलॉ जात नॉतॉ. मारु्न असो.

    हांगॅसॉ मदु्दॉ अहॉ गा, आपल्या पोरीदो वनरोप आलॅ हायद ॅअन आपल्याला ता नाता पसांद हायद ॅतॅ "हा" हांगॅसा, नाय तॅ

    "नाय" हांगॅसा ओडी सोप्पी पद्दत, पन रु्पार्यायी बायरु् सरळ उत्तर ददेआे ! नाय हांगॅदो पन ती दा र्ारने ददे.ॅ.. आमासॉ ऑ मंबयसॉ

    आलॉ गा तॅला विसरॉन हांगातॅ, पोरीला अजनू वशक्षन र्रॅसा हाय, अडनॅ पासनू तॅ मा पोरीला वनरोप धाड्यादो त्या भामटीला लाज

    नाय िाटली, तूमशी लायर्ी हाया आमश्या पोरीला वनरोप धाड्याशी, वतला हांग तुआ पॉरा पगारात मा पोरीइ लाली-पािडर पन याशी

    नाय इतपयांत र्यपन उत्तर वदला जातॅ.

    र्तॅ र्तॅ हॉतॅ र्ा वर् पॉरा घरशे अन पोरीआ घरशे या दोघावमनॅ घरोब्याय संबंध आहात्यात. पॉरा घरशाला पोरी पसांत

    आहातॅ पन विसरॅ गेला अन तॅयी नाय हांगीला तॅ आपलॅ सबंध वबघाडद्यात भगून मंग तॅ डायरेक्ट न विसरता रु्ना वत-हावयताला एर्

    डमी वनरोप द्या हांगात्यात. तॉ डमी वनरोप दॅनारॉ आहा हांगातॅ र्ी, तूमशी पोरी अमरु्ा पॉराला द्या नायद ॅतॅ आमशा पॉराि वनरोप दसॅॉ

    ऑथॉ. अन ्मंग तॅनला वमळणार्या उत्तरोरनॅ आपनू वनरोप दसॅॉ गा नाय ता ठरविला जातॅ.

    मा पोरीला / पॉराला ५० वनरोप आलतॅ, १०० वनरोप आलतॅ अहॉ खरॉ खॉटॉ वहशेब ठिॉन, तॅला मीठमसालॉ लािॉन

    शारसॉघात हांगॉन वमरिनारे पन आहात्यात. गम्मत वमनजॅ बी रु्ना पोरीआ हयरा जाला, गा तॅआ पॉरानॅ मा पोरीला तीन तीनदा वनरोप

    धाडलोतॉ आहा हांगॉन तॅआ पोरीइ अन पॉराई मारे्ट व्हलॅ्य ूर्मी र्रनारॅ पन आहात्यात.

    र्तॅ र्तॅ आपनू धाडलेलॉ वनरोप पॉसलॅ गा नाय ई र्ळॅ नाय, पॉसलॅ हायद ॅतॅ त्याई "हा" हांगीलॅ, "नाय" हांगीलॅ, गा "नंतर

    र्ळवित्याि" हांगीलॅ ई पन र्ळॅ नाय. त्याबनी माि एर् वमत्र सितास त्याि वनरोप घॅिॉन गॅलॉ, तॅ पोरी बय हांगातॅ तूआ आदी

    अ ॅर्ापेक्षा एर् अह ॅ१५ वनरोप आल्यात पन आमशी पोरी मन भरीस नाय ती ! मा वमत्रानॅ रॉर्डा विसारला, मॅ "नाय" समजॉ, गा १६

    नंबरसा टोर्न घॅिॉन दापुडॅ वहदंाळ्यात बॅहॉ ता हांग !

    वनरोप ऑ विषय रु्पा-यार्रता ऑडॉ वजव्हाळ्याि अहॉन सदु्धा आजपोत योर रु्नॅ वलविला र्य नायद ॅऑहॉ विसार तुमशा

    मनात येद ॅतॅ तॅआ उत्तर आहा हाय र्ी १) ज्या व्यवक्तये शेर्ड्यािारी वनरोप नामंजरू जाल्यात तॉ रु्हनॅ तॉडंानं या विषयोर बोलनार?

    २) ज्या व्यक्तीनॅ डझनािारी वनरोप उडिॉन लाविल्यात आन शेिटी हातात र्ासलुी आले, ती व्यक्ती रु्हनॅ आथानॅ या विषयोर

    वलिनार आन ३) वजने धाडलॅल्या नातॅ आलॅल्या पयल्यास वनरोपोर लगीन रॅ्लॅ वतला िाटतॅ ओडी उतळी रे्ली नसती तॅ जरुुर् निा,

    अपग्रडेड मॉडेल वमळलोसा. असो.

    आजही एखाद्या लग्नात नातॅ सािकजवनर् समारंभात एखादी बाई, दहुरॉ एखादॉ इसम, आपल्या निर्याला दािडॉन तॅआ

    र्ानात र्य हांगातॅ हायद ॅतॅ समजॅसा गा ती हांगातॅ तॅआ माहनाि माला वनरोप आलतॉ. वतगाळा वतला हांग्यासा आहातॅ र्ी मॅ तू

    बरबर लगीन र्रॉन तुओर र्ॉडॅ भॉटॅ उपर्ार रॅ्ल्यात. आन तॉ निरॉ मनातशा मनात बॉलातॅ, इनॅ तॅआ इसमा बरबर लगीन रे्लोसा तॅ

    म ॅहुटलोसॉ !

    आतॅ एर्दम वनखिाना हांग्यासा वमनजॅ, रु्नसु या विषयोर वलवित नसताना मॅ वलविला र्ादो, तॅ ! मा मनात एर् िेदना हाय.

    आज मा दरी जर्ला र्य हाय.. नाि हाय, इज्जत हाय, इस्टाल-फजाल हाय, मा पडुशॉ सात वपढ्यो बेहॉन खायद्यात ऑडा मजबतू मा

    दरी डायवनंग टेबल हाय. पण मॅ अठिरॉ असताना माला एर् पन वनरोप आलॉ नाय. माला धाड्यासॉ वनरोप घरश्या लॉर्ा धार्ाय

    रु्ना मनातशा मनात रॅलॅ हायद,ॅ धाडलेलॉ वनरोप रु्नॅ वमनशा वमनॅ खालॅ हायद,ॅ रु्नॅ माि वनरोप बी र्डॅ वफरविलॅ हायद,ॅ एखादॉ

    वनरोप मा घरशाइ मा पोत पॉसॉन वदलॉ नाहदे ॅअही मॅ मा मनाई समज र्ाडली. पण...... पोस्टातनॅ र्ाहा एखादा पत्र पंधरा िीस िहरान

    येतॅ तॉहॉ एखादॉ रॅलॉ घॅटलॉ, खरॉ खॉटॉ, आतॅ र्ईस फायदॉ नहलॅलॉ, एक्स्पायर जालॅलॉ एर् वनरोप अजनू येद,ॅ अही मॅ िाट

    बवगतॅ.... एर्दा र्ा तॉ वनरोप आलॉ, गा मॅ र्ाईमशॅ डॉळॅ वमडक्यादो मॉर्ळॉ !

  • मस्कत - मुांबई ईवान प्रवास !! – नेल्सन वडमेलो, जितळा

    नेहमीपरमानॅ चेर्-इन र्ाऊंटर िरशा अरबी पोरीला विनंती र्रॉन ईिानात १०C सीट वमळविलता. या शीटसॉ फायदॉ

    ऑडॉस गा पडॅू पाय लांब्या जरा मोर्ळी जागा आहातॅ आन सीट दरिाज्या नवजर् अहल्यानॅ उतर्यादो झटपट. मॅरसा १०B खालीस

    ऑथा. ऑड्यात एर् मस्त सूंदरा ईिानात वखरताना वदखली, मॅ डॉळॅ वमडर्ीलॅ आन मािलीला हार् मारली "मािले, इला मास मॅरॅ

    बेव्हड लो", डॉळॅ उघडलॅ, बगीतॅ तॅ खटला मा मरॅनॅ िटािला. मॅ विसार रॅ्लॉ, जािूंद ेसल.. आज र्ॉडा लोर् गणपत्याला आन

    ईदीला साल्ला त्यांयी पान वतला बगॉन प्राथकना रे्ले हायदॅस. गणपत्यानॅ, अल्लानॅ त्या रू्ना अ ॅर्ाइ प्राथकना आयर्ीली, शेिटी जॅआ

    तॅआ नशीब !!. ताि मा मॅरॅ एर् भयैा नखीतर अ ॅिॉन बॅहलॅा.. मा नशीबात अितर्या भयैास ऑथा... मंग थॉड्यािॅळानं एर् बारर्ा

    बाब ूिॅ ंग्यात घटेलेली बायरू् आमशा मॅरॅ आली आन मा मॅरशा त्या नखीतरांला हांगातॅ "मा बाळाला पाळन्यात घाल्या लागॅद ॅआन

    तूआ शीटश्या समोर पाळनॉ लाव्याशी सोय हाय तॅ तू मा शीटिर जाय आन माला तूआ वसट दे". ता अक्र्रमशा र्य ऊठ्या तयार

    नाय.. मंग म ॅवतला हांगीला "म ॅऊठातॅ" त्या अर्र्याला मा शीटिर या हांगीला, वतला त्यां शीटिर भेिीला आन मॅ तीआ 44B शीट

    बगीत वनंगालॉ..

    तूमाला पट्यासा नाय, मा निा शीट नॅमर्ा ती जी सुंदरा बेहलेती तीया मॅरसा गा !! ती 44A वखडर्ीत आन मा 44B. माि

    विश्वाससू बॅह ॅनाय.. मंग जही मािली बोयली "अरे अल्प विश्वास ूतूझ्या सत्र्ायाकचं फळ तूला वमळाले आह"े..

    बरा र्ाम रॅ्ला तॅ मािली र्तॅ्तस टार्ी नाय !!

    म ॅवतला Hello बोयलॉ वतनॅ पान मस्त तॉडं पाताळ र्रीत Hi बोयला.. मॅ मायी बॅग िर ठोयली आन आहा र्रबूट सीटिर

    टॅरॅ् बास ताि तीनॅ ‘हलॅो, हलॅो’ बॉलॉन माला तडर्ान उडिीला.. माला िाटला वतऑ आथ मां शीटिर हाय गा र्ा? माला

    हांगातॅ, "माफ र्र, पान यी नक्र्ी तूआस शीट गा? नाय वमंजॅ मॅ चेर्-इन र्रताना एर् विनंती रे्लती, गा माला लेडीआ मॅरसा शीट

    द्या.. तॅ माला, मॅरे लेडी अपेवक्षत ओथी..

    म ॅहांगीला, "बरबर, अडे एर् लेडी बॅहनेार ओथी पान ती दरी बाब ूअहल्यामळॅू वतनॅ मा हरी शीट बदली रॅ्ला भगून

    लेडी एिजी ऑ लेडा तूआ मॅरॅ बॅहा आलॅ, तूला र्यं अडसन हाय?" मॅ मस्र्त ड्यूटी फ्री वमनसॉ फूर्टसॉ टेस्टींगिाळॉ भारीसॉ अत्तर

    मारलॉतॉ तॅ मां आंगाला बरॉ िास ूतान येतोतॉ, तॅ वतला िाटला पॉर स्टॅन्डडक वदखातॅ.. तॅ ती हांगातॅ ‘नाय नाय.. नाय, तही र्य अडसन

    नाय, तू मां मॅरे बॅहलेॉ तरी सलदॅ पान म ॅर्ा हुमज्यासॉ ता हुमजालॉ. "यीला गि महान ूमॅरॅ हॉशे नाय.. माला जरा हांबाळला पाय.."

    आमश्यां शीटशा वमनश्या आथ ठॉयाशा दांड्याि ताबॉ वतनॅ घेटलॉतॉ भगून मॅ आथायी घडी घालॉन जेंटलमन हारर्ॉ

    बॅहलेो.. ईिान हूटला, थॉड्या िॅळानं खा-प्या आला.. माला िाटला मॅ दारु बीअर घेटली तॅ मां इपें्रशन खराब हॉयद ॅआन वतला टेंशन

    येद.ॅ नायतरी न सलत्याला वतनॅ माला मॅरॅ होशीलॅ.. र्डे मां दारु बीअरसा वनमीत हॉअ ॅसा आन माला ऊठव्याशी.. तॅ मॅ मन मारला

    आन संत्रयांऑ रस घॅटलॉ.. आन तीला हिाई सुंदरीनॅ विसारला, तॅ वतआ मायला वतनॅ बीअर घेटली.. तूमाला हांगातॅ मा डॉखा वफरला

    पान मातॅ जेंटलमन हॉिॅव्ता? ताि वजिान आला. तीनॅ र्ोंबडीआ मांगविला आन मॅ बर्र्या मटणं मांगविला. वतनॅ स्टाईल वमनॅ र्ाटॅ

    समशाय खा सुरुिात रे्ली. म ॅस्टाईल मार्या गॅलॉ आन माि समसॉ खाला पडलॉ.. बटू र्ाडॉनं पायायें सापीलॉ तॅ पायाला लागाते,

    पान पडॅु वजिनाि टे्र, आतॅ समसॉ टूरॅ्आ ऑनिा हॉअ ॅसा तरी र्ाहा? मंग र्ाटॉ आन हूरीअ ॅ सरूिात रे्ली. जेमतेम दोन शार दानॅ

    र्ाट्याला येतोतॅ.. वजव्या पान जाम हाल जालॅ. वजिने जाल,े लाईटी बंद जाल्यो. पान वनज्या वहमंत हॉअ ॅ नाय, र्डे वनज्यात हातायी

    घडी हूटेद ॅत्याि घाबरॉ. म ॅजेंटलमन तॉ? दारु बीअर मॅ पेयोती तॅ वतला जागरान ऑथा पान बीअर वतनॅ वपली आन वनज मायी

    घालविली.. आख्खी रात जागॉ.. दोनदा वनज्यात वतऑ आथ मा मांडीयोर पडलॉ पान मॅ लगेस ब्रेसलेटिर टूर्ीलॉ आन शीटशा

    वमनशा दांड्योर ठोइलॉ, जेंटलमन ना म?ॅ. आख्खॉ प्रिास हातायी घडी र्रॉन अखांड शॅ अखांड बॅहॉन रॅ्लॉ. आख्खा आंग दखू्या

    लागला.. एरं्दरीत वतआ मॅरॅ बहॅॉन फायदॉ र्ाडीऑ जालॉ नाय पान मा वजिाशॅ नसूतॅ हाल जालॅ.. ईिान उतरॅसॉ िखत जालॉ,

    लाईटी लागल्यो..

    मॅ मािलीला परत हांर् मारली "मािले !! आज मायी होस परूली लो.. परत माला रू्ना सुंदरा मॅरॅ बॅव्हडॉ नार्ा लो !!

  • पातेरातसॉ शा आन माकडे – वमल्टन वडर्ोस्टा, गाहा

    पातेरातशॅ ३.०० िाजलोतॅ, मोबाइलसा आलामक िाजला. रु्र्ला उठविला. वपर्वनर् शा लॉर्ांर्रता शा र्रॅसॉ ऑथॉ.

    रु्र् हांगातॅ, ‘वमल्टन दधू नाहालॅ. िाट लागली..!!

    वसमला रु्ल ुमनाली २००७ टूर र्रता ४५ लोर् ऑथॅ. वदल्ली, आगरा, बगॉन लोर् वसमलाला आलते. वसमला ई वहमाचल

    प्रदशे वमनसा थंड्या हिेआ वठर्ान. मॅरॅदरॅॅ जंगाल ऑबडा आन बॉठे्ठ डोंगर. अड़े झाडोर मार्ड़े जाम. मॉल रोडला, शॉवपंग र्रता-

    र्रता तीन वद र्ह ॅभरलॅ पटर्न. आज पातेराती वसमलािरनॅ मनालीला वनग्यासा ऑथा. शा पॅिॉन आप ुनीगनार तॅ तुमश्यो बॅगो भरॉन

    ठिा. आहा लोर्ांना हांवगलता. सादारन ४.३० िासता नीगॅसा ऑथा. वसमला तॅ मनाली सादारन १० तॅ १२ तास परिास. भगून

    ठरल्या परमाने म ॅउठलॉ.

    ४ लीटर दधू. आदल्या वदहा हाडॉन ठविलता. पन आमश्या दरी फ्रीज़ नॉता पन ठंड़ी ओथी तॅ दधू रु्र्नॅ बारूस ठविलता.

    दधू नाहाला. आतॅ बीया हाड्या पाय भगून म ॅरु्र्ला हांगीला गा में दधु हाड़तॅ तुमे बी तयारी र्रा. वसमलाला दर िहरा बेताम लोग

    येत्यात. ड़ोंगरोर हॉटेल आन खाला बाजार. र्य पाय द ॅतॅ खाला जादो लागातॅ. सढ़ नातॅ उतार. माहन ुदोनंदा तरी बॅहलॉ पाय. हापात

    हापात येतॅ माहन.ु तर हार्ोटे ३ िासता माला र्ळॉन सरू्लोता गा आतॅ माला बाजारा जादोस लागॅ. में घाई घाईत तॉ ाँड धिोन

    दधू घ्यादो पळालॉ. ऊतारता ऊतारता माय नारे् नऊ जाल.ॅ अ ॅर्दासा दधु घॅटला आन िर यादो लागलॉ.

    एर् एर् वलटरशे ४ पावर्टे दधु. तडे प्लावस्टर् बंदी एर्दम र्डार् हाय. पॅपरा खार्ी वपशिीत ४ पावर्टे टार्ीले आन

    हॉटेलशा वदशेनॅ सल्यादो लागलॉ. १५ वमनीटा अंतर ऑथा. मॅरॅदरॅॅ र्ाळोरु्ट्ट र्ाळोख. हापात हापात मॅ िर जातोतॉ. िर जाताना

    हळूहळू मॅरॅदरॅॅ र्यतरी हालसाल जानव्या लागली. र्ाळोखात समर्नार् या डॉळॅय माओर रु्न्तरी बगीतोता. मनातनॅ जरा घाबरलॉ पण

    में सलात रॅलॉ. हळूहळू माला जानिाला गा मा मागे रू्नतरी येतॅ. भतूबीत आला गा र्ा?? पन माला र्ळला मागे मार्डे ऑथॅ.

    जिळ जिळ १०-१२ ओथे. म ॅबगीता बरबर त्याइ माला शारी बाजनॅु घेरला. डॉळॅ भॉठॅ रॅ्लॅ. जबडॉ उगडॉन भॉठॅ भॉठॅ दात दाखड्या

    लागले. दोघे तीघे मा आगंोर या लागले.

    मार्डाय खाला तॅ रेवबज ऑथॅ. दर िहरा बेताम लोर् मरात्यात. माआ डॉळॅत र्ाजिे समर्ाले. आतॅ आपला र्य खरा

    नाय. माला हुमजाला गा मार्डांना मा दरशी वपशिी पाय. पन वपशिीत ऑथा दधु.. ता तॅ पॉसलास पाय. र्ा र्रॅसा? विसार र्रॅदो

    टाईम नॉता. म ॅर्य वपशिी होडी नाय ई बगीता बरबर तॅ अजनुूस आंगोर यादो लागले. मॅ पन जॉराय रॅ्रॅ्दो लागलॉ. मॅ त्यांना रॉखॉन

    धरलोता. पन माला पन र्य र्रता येत नॉता. मा अिसान गळ्यादो लागला. मार्डाय माला खाऑन टारे् अहास िाट्या लागला.

    मािले माला िासि. म ॅमािली दरी धािो सुरु रॅ्लॉ..

    मार्डे आन म.ॅ.. जिळ जिळ १०-१२ वमनीटे एर्मेर्ांना रॉखॉन ओथे. मॅ घाबरॅय जाम रॅ्र्ातोतो आन नॅमर्ा माला एर्ा

    पोवलसानॅ बगीला, तॉ धािात मा वदशेनॅ आलॉ. आथात दगड घॅऑन मार्डांना मारॅदो लागलॉ. दगड येता बरबर मार्डे

    घाबारले आन मागे हटले. म ॅपन या संधीऑ फायदॉ घॅटलॉ आन खाला पडलॅलॅ दगड टुर्ीलॅ आन मार्डांना मारलॅ. मार्डे

    पळाल.े म ॅतॅआ पोवलसला जाऑन वमठी मारली. माला जाम रडा आलता. तॅय र्ह ॅआभार मानॉ ता र्ळात नॉता. माऑ जीि

    िासलोतॉ पन तडे थांब्यादो टाईम नॉता. म ॅआथाशी वपशिी जक्र्ॉन धरली आन हॉटेल िर गॅलॉ. दधू वदला. लोर् शा र्रता िाट

    बगीत बेहलेते. शा वपलॉ, पाँवरं्ग रे्ली आन आमे मनाली ला जादो वनगाले..

    आज या गोष्टीला खबु िहरे जाले. म ॅखबु िॅळा तडे जाऑन त्या पोवलसाऑ शोद ्घॅटलॉ पन तॉ र्य नाय भॅटलॉ. तॅला नक्र्ीस

    मािलीनॅ धाडलोता. तॅआ रु्टंुमाला मािली सखु दओे.

    अांकाकरता देनगी – अनावमक, रानेिाट – ` १००० / -

  • आध्यावमक तयारी - राज फरगोज, सॉर्ाळा

    र्ाल अ ॅर्ा चचकिर फादरला भॅट्या गॅलतॉ. िारता सरुु हात ति एर् माहन ुआलॉ. तॅनॅ फादरला ओळख वदली, आतॅ जे पोरे र्ॉमसार हिॅशे

    तॅआ वमनश्या अ ॅर्ा पॉराि मॅ पप्पा आन तमुी माला भॅट्या बोलविलॅ.

    फादर बोयलॉ OK या.

    फादर : र्ॉमसारायो चार वमटीग जाल्यो पन तमुे र्तॅ आले नात. तमुशी वमसेस येते.

    तॉ : फादर म ॅिसय र्ामाला हाय. माला आयत्िारॅ रजा नहातॅ.

    फादर : मग आध्यावमर् तयारी र्ते र्रनार.

    तॉ : फादर तयारी जवक्ल जाल.े मांडि हांवगलॅ. र्ाँ टरसकला जीिनाई आाँडकर दओेन मेन ूफायनल जाल्यात. जवक्ल तयारी जालेली हाय.

    फादर : आरे म ॅत्या आध्यवमर् तयारी विषयी बॉलातॅ. तॅआ र्ा?

    तो : र्ा फादर..? तमुेस प्रिचनात हांगात्या गा ठिेशी नाय आन िाडॅशी नाय. तरी पन मॅ बाजशुा टेरेस िर सोय रे्ले.

    फादर नॅ डॉखा रु्वटला.

    अस्तॅ..! अस्तॅ...! - रचना रॉविक्स, पहराि

    अस्त ॅअस्त ॅ....

    ियाशी शावळशी अ ॅिॉन उतारात ऊबी रॅतॅ

    र्ोडी बी लपविली तरी, माथ्याशी पांढरी बट र्ाना मागनॅ गपचपु डॉर्ायतॅ

    पाय ठोइता खोटी िजनाि र्ाटॉ गरकर्न वफरातॅ

    हारर्ी ऊभी रॅ गा नाय ताि ७० आर्डॉ गाठीतॅ

    तरी िनवपस घाल्या माला होसूस िाटातॅ

    आजर्ाल माला बेताम वबनधास िाटातॅ...

    अस्त ॅअस्त.ॅ..

    सानलुे जरशी हडरे् हॉत्यात, रगाजळ नाखोडी र्मी हॉया लागातॅ

    हाऊ शी हाऊवगरी बर्यापैर्ी वनिातॅ (वरं्िा मॅ वनवितॅ)

    हरॉ ऑटोमॅवटर् आऊट ऑफ डीस्र्शन जालॅलॉ आहातॅ

    निरॉ तॅ आत ॅमाला रानीस बनिॉन ठोईतॅ

    आज र्ाल माला होम वमवनस्टर जाल्या हारर्ास िाटातॅ..

    अस्त ॅअस्त.ॅ...

    लोर् र्ा बॉलद्यात याि विसार मनात यासॉ रॅतॅ

    दिेळा जादो साडी नॅह्याशी गा िेस याई वचंता र्मी िाट्या लागातॅ

    मा िेस शा र्लसक िर पोरांशा आिडी ई छाप पड्या लागातॅ

    मा मॉवनांग िॉर्, मा वफटनेस या पारडा जरशी जड हॉया लागातॅ

    आज र्ाल माला मॉर्ळॉ श्वास घॅता या लागातॅ

    आस्ते आस्ते मॅ नोर्रीत पण बॉठ्ठी ऑथॅ

    वसल्र् शा साड्याई के्रझ िाडात जातॅ

    थॉडा घना हॉना, ( निर्या चॉईसन ॅपन सॉता र्माईनॅ)

    घ्याशी वहम्मत येतॅ...

    शरयत तॅ सालसु रेनार आहातॅ...

    धक्रॅ् तॅ बॅहनॅारुस आहात्यात

    तरी पन आज र्ाल माला वजर्ात सल्ल्याई वफवलंग

    येतॅ...

    मा बॉलना तलुा घॉलाना िाटातॅ...

    म ॅफोन रॅ्लॉ गा तलुा िैताग येते...

    आख्खॉ वद तलुा म ॅहरॅान र्रतॅ....

    मग म ॅर्तॅ रडॅ लागली गा

    तआु र्ाळजात र्ळ र्दो उठातॅ

    - वलसा तुस्कानो, गाहा

  • वशमाऑ इांटरव्यू - वसमसन रॉिीग्ज, परसाि नंदाखाल

    १९९४ सालशी गोष्ट ! 'हा-नाय'; 'बाबा-पतुा' र्रॉन वशमाआ दादय-बाबानॅ वशमाला इटंरव्यलूा जादो एर्दासा राजी

    रॅ्ला. शीमाआ र्ार्ाई अ रॅ्ा शाळीत बोठी िट ओथी; तडॅ एर् वशपाई पाितॉ. भय धॉयाशी आिड अहलॅल्या वशमाला बार्डा

    पहु्याशी जबाबदारी थोडीस पसांद यनॅार ओथी? पन र्रता र्ा? बाबा-दादयसॉ मान ठॉऑन इटंरव्हूाँला जाना शेिटी भागसू ऑथा.

    तॅत शाळा होडल्योर ओडे िहर�