marathimandalee.weebly.commarathimandalee.weebly.com/.../2/10529447/project-full.docx · web...

225
ससससस सससस सससससस |

Upload: others

Post on 25-Dec-2019

67 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

सत्यं शिवं सुंदरम |

मम ज्ञान मंदिरम ||

प्रस्तावना

बालकृष्णाचे रूप जसे गोपींना वेगळे, गोपांना वेगळे, मल्लांना निराळे , काडीपहिलवानांना निराळे , तरुण स्त्रियांना साजरे , वृद्ध मायलेकांना गोजरे असते , तशीच शाळेची प्रतिमाही प्रत्याकाच्या मनात वेगवेगळ्य प्रकारची असते.कोणासाठी या केवळ चार बंदिस्त भिंती असतात , तर कोणासाठी ती जीवनाचा गर्भितार्थ सांगणारी वास्तू असते.शाळेची कल्पना काहींसाठी फक्त मज्जा , मस्ती , धम्माल यांपुर्तीच मर्यादित राहते , तर काहींसाठी याच शाळेची कल्पना क्षितीजापर्यंत विस्तारते.

काहींना ' छडी लागे छम छम , विद्या येई घम घम ' या उक्तीचा अनुभव देणारी ती वाटते , तर काहींना ती दुसऱ्या आईप्रमाणे भासते.अशी ही शाळा काहींना गोड , काहींना आंबट , काहींना तुरट , तर काहींना अगदीच तिखट अनुभव देऊन जाते....!! असेच काहीसे अनुभव आमच्या १०वी ग्रीष्माच्या वर्गानेही अनुभवले......हेच आगळेवेगळे अनुभव आम्ही या प्रकल्पातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

काहीच दिवसात आम्हाला ही शाळा परकी होणार,त्यामुळे शालेय जीवनातील अनुभव टिपून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही या प्रकल्पातून केला आहे.ह्या प्रकल्पामुळे

आम्ही शालेय जीवनात आलेल्या आठवणी पुन्हा जगलो , त्यांचा आस्वाद घेतला.तुम्हालाही असे अनुभव आले असतील , ह्यात काही शंकाच नाही....!! परंतु आमचे हे अनुभव वाचताना तुम्हीही तुमच्या बालवयातील अनुभवांमध्ये रमून जाणार.....आठवणीत हरवून जाणार...याची आम्हाला खात्री आहे. श्री.संतोष कदम सर ह्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव कायम स्मरणात राहावेत म्हणून ' शालेय अनुभव ' ह्या विषयावर ' बुकलेट ' तयार करण्यास दिले.सुरुवातीला आम्हाला हे सर्व कंटाळवाणे व किचकट वाटले....परंतु हा प्रकल्प तयार करायला घेतल्यावर आम्हाला या सगळ्यात मज्जा वाटायला लागली.आम्ही ह्यामुळे एका वेगळ्याच विश्वात हरवून गेलो.

कदम सर , तुम्ही आम्हाला हे अनुभव पुनः जगण्याची सुवर्णसंधी दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार ...!! तुम्हालाही आमचा हा प्रकल्प आवडेल , हीच सदिच्छा...!!!धन्यवाद,

तुमचा लाडका वर्ग ' १०वी ग्रीष्म'.

ग्रुप 'अ'

शिशु ज्ञानवर्धन मधील छोटा शिशु आणि मोठा शिशु या दोन पूर्व प्राथमिक वर्षांची स्नेहसंमेलने  शिव समर्थ विद्यालयाच्या  भव्य व विस्तृत पटांगणावर झाली आणि आम्ही शाळेशी अप्रत्यक्षपणे जोडले गेलो. मग खऱ्या अर्थाने जेव्हा या शाळेचे क्रीडांगण , येथे घेतला जाणारा परिपाठ , एकंदरीत येथे मुलांवर होणारे संस्कार या सगळ्याचा प्रभाव म्हणा परिणाम म्हणा आमचे या शाळेशी नाते जोडले गेले.

पाटीवरील आयुष्यरेषा वहीवर रेखाटण्यास सुरुवात झाली. हातातली बास्केट पाठीवरच्या दप्तरात परिवर्तित झाली .फुलनावांच्या वर्गावारीवरून १, २, ३,४ या तुकड्यांकडे पाहता पाहता शाळेचा पहिला दिवस उजाडला.खरा सांगू का? सतरंजीच्या धाग्यांशी खेळता खेळता बेंचवर कोरण्याची वाल कधी आली हे समजलेच नाही .शालीत प्रवेश करताना काही मने उत्साहित होती तर काही काळ आई-बाबांपासून दुरावले जाणार आणि पूर्णतः अनोळखी वातावरणात वावरावे लागणार यासाठी काही जण रडतही होते. पाटीपेंसिलाकडून शीस  पेन्सिलकडे जाताना आईप्रमाणे बोट धरून चालवणारे शिक्षकही मिळाले . 

आज शालेय जीवनाचा अखेरचा प्रवास करताना आठवणींचे जे काही धागेदोरे सापडतात त्यावरून अनुभावरुपी आठवणींची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

प  - परिपूर्णता आणणारा

रि - रिक्तता विसरायला लावणारा

पा - पावलोपावली संस्कार लावणारा

ठ  - ठेक्यावर मजेदार वाटणारा कार्यक्रम

या चार अक्षरांचा अर्थ आमच्या जीवनात काही वेगळाच आहे.सध्याच्या हनी सिंघ , सोनु निगम , श्रेया घोसाल , धनुष यांच्या गाण्यांपेक्षा सत्यम शिवम सुंदरम , हि भूमी जगदीशची , देहमंदिर चित्तमंदिर , खरा तो एकाची धर्म हि गाणी आम्हाला जास्त प्रिय आहेत . ती गाणी अजूनही आमच्या ओठांवर रेंगाळतात . भारतातील विविधातेप्रमाणे या गाण्यांतही विविधता म्हणजे सोमवारी सत्यं शिवं सुन्दरं , मंगळवारी अथर्वशीर्ष , बुधवारी , कृष्ण गोविंद गोपाल , गुरुवारी नाम सदा बोलावे , शुक्रवारी देहमंदिर चित्तमंदिर , शनिवारी मारुतिस्तोत्र अशी होती . या आगळ्यावेगळ्या परिपाठाची जबाबदारी सानप सर , शैला बाई , उतेकर सर , राणे बाई या आमच्या प्राथमिकच्या शिक्षकांकडे असायची .

काळाच्या ओघात संगणक युगाचे चाहते झालेले आम्ही काही निसटलेले क्षण फोटोग्राफ्स मध्ये शोधू लागलो पण काही क्षण काही अनुभव असेही आहेत जे विस्मरणाच्या पलीकडे गेलेत . त्यातलीच काही आमच्या प्राथमिक शालेय जीवनातले अनुभव आम्ही येथे मांडणार आहोत

शाळा म्हटली कि शाळेची वास्तू किंवा आपल्या जीवनात अविभाज्य वाटणारा शाळेचा परिसर , शाळेचे वातावरण , हे काही औरच !!! याच विषयी आमची एक भाबडी आठवण आहे , आम्ही पहिलीत असतानाची . शाळेच्या माध्यमिक आणि प्राथमिक विभागांना जोडणा-या भागात तळमजल्यावर एक विहीर होती. म्हणजे इतर विहिरींपेक्षा ती काही निराळी नव्हती पण त्या विहीरीत बहुदा पाणी दिसत नव्हते . आता तुम्ही म्हणाल पण त्यात गंमत काय ? तर गंमत अशी कि , विहिरीत एक कासव होता . लहानपणी कसा असतं ना कि निरागसता हि ओसंडून भरलेली असते आणि हीच निरागसता नंतर आम्हाला त्या तळाशी घेऊन जायची . नंतर कदाचित मुलांच्या सुरक्षिततेसाठी ती विहीर बुजवली , पण उत्सुकतेने ढवळून निघालेला जिज्ञासु असा तो डोकं वर काढून पाहणारा कासव अजुनहि मन आनंदित करतो

लहानपणी गणपती बाप्पांच्या गोष्टी आणि त्यामुळे काही काळ शिक्षकांना त्रास न देता , मस्ती न करता शांत बसणारे आम्ही आणि चित्रपट बघून माय फ्रेंड गणेशाची गाणी गुणगुणणारे आम्ही एक प्रसंग आठवला कि त्यावेळी भ्यायचो पण आता ते मजेशीर वाटतं . अफवा आणि अफवा पसरवण्यात भारतीयांची गती कदाचित तेव्हापासूनच जाणवायला लागली . परंतु लहानपणीच्या शाळेतील अफवा फार मजेशीर होत्या . या अफवांना गणपतीसुद्धा मुकला नव्हता . विचित्र वाटलं ना !! सांगतो ....

शाळेच्या माध्यमिक विभागाच्या इमारतीत तिस-या मजल्यावर काचेच्या पेटीत गणपतीची एक मूर्ती होती . तर अफवा अशी होती कमी सगळेजण म्हणायचे त्या गणपतीच्या मूर्तीचे डोळे हलायचे . प्रथम आम्हाला ते ऐकल्यावर भीती वाटली , बालवयीन उत्सुकता म्हणून आम्ही ते पहायला गेलो . ते पाहिल्यावर आम्हाला देखील असेच वाटले होते कि गणपती खरोखरच डोळे हलवतो . नंतर आमच्या मित्राने हे त्याच्या बाबांना सांगितले . तेव्हा त्याच्या बाबांनी गणपतीचे डोळे हलण्याचे खरे कारण सांगितले . त्यांनी सांगितले कि , गणपती ज्या काचेच्या पेटीत ठेवला होता त्या काचेमुळे त्याचे डोळे हलताना दिसतात .

आमच्या शाळेत आम्ही जी जी मजा केली त्यापैकी वर्गातील मजा काही औरचं होती . आम्ही काही खोडकरपणा केल्यावर आम्हाला बाई शिक्षा करत ती शिक्षासुद्धा आम्हाला एक प्रकारची मजाच वाटायची .

एकदा आम्ही वर्गात बाईंच्या टेबलाजवळ उड्या मारून मस्ती करत होतो .दहीहंडी जवळ आल्याने आम्ही सर्व जोशात होतो. त्याचप्रमाणे आम्ही वर्गात दहीहंडी करत होतो . पूर्ण जोशमध्ये आम्ही नाचत , उड्या मारत होतो तसेच बाईंच्या टेबलावर नाचत होतो . नंतर बाई आल्यावर त्यांनी खराब झालेले टेबल पाहिले . बाईंनी आम्हाला हे कोणी केल्याचे विचारले त्यामुळे आम्ही खूप घाबरलो .बाईंनी असे खूप वेळा विचारल्यावर शेवटी आम्ही बाईंसमोर गेलो व बाईंची माफी मागितली. आम्ही माफी मागुनसुद्धा बाईंच्या शिक्षेपासून वाचू शकलो नाही . शिक्षा फार भयंकर होती . आम्हाला बाईंनी शर्ट काढायला लावले व शर्टने ते खराब झालेले टेबल पुसायला लावले . त्यावेळी कदाचित काही वाटले नसेल परंतु आता फार वेगळेच वाटते .

शाळेची मजा म्हटली कि एकमेकांना नावे ठेवणे आलेच . काही शिक्षकांनीदेखील अशीच काही नावे ठेवली होती . आमच्या वर्गातील एक मुलगी ' like a baby doll ' होती . म्हणून तिला आमच्या उतेकर बाई 'दुधाची बाटली' म्हणायच्या त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या श्रीरामे बाई 'मनाली'ला 'मणाली' म्हणुन हाक मारायच्या . आम्हाला तेव्हा खूप हसायला यायचे . तेव्हा आम्ही तिला ' मणाली काय म्हणाली ' असे चिडवायचो . परंतु नंतर आम्हाला समजले कि त्या 'न' ला ' ण ' म्हणायच्या .

पूर्वी टी . व्ही . वर लागणारे WWF व आत्ताचं WWE आणि आम्हा मुलांना प्रचंड इन्स्पायर करणारे कार्यक्रम आणि त्यातले THE ROCK , Triple H (HHH) , John Cena , हे त्यावेळी आमच्या साठी असलेले हिंदकेसरी , यांचा आमच्यावर असलेला प्रभाव जाणवणारा एक मस्त प्रसंग आठवतो . दोन वर्गांमध्ये लागणारी चुरस , होणारे हेवेदावे या सगळ्याचा परिणाम म्हणून उतेकर सर आणि उषा पाटील बाईंच्या वर्गातील आम्हा मुलांमध्ये असेच काहीसे हेवेदावे झाले होते या हेवेदाव्यांचा परिणाम चपलांच्या मारामारीपर्यंत गेला. याचदरम्यान आमच्यातला कवी जागृत झाला आणि आम्ही एक चारोळी बनवली आणि ती चारोळी अशी होती कि -

'आला आला वारा,

चप्पल घेऊन तुम्ही मारा ।

याला मारा त्याला मारा ,

चप्पल घेऊन मारा ।।'

आणि या आंतरवर्गीय युद्धाचा शेवट शिक्षकांच्या तहाने झाला . या तहाची झळ एका वर्गाला पोहोचली नसून ती दोन्ही वर्गांना पोहोचली .

आमच्या शाळेला शिवदौलत सभागृह हे प्रशस्त सभागृह लाभल्यामुळे त्या सभागृहाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत . मैदानाबरोबरच खेळांचा दुसरा अड्डा म्हणजे सभागृह .त्या सभागृहात आम्ही  लंगडी मामाचं पत्र हरवलं , पकडापकडी , झटापट , डोंगर का पाणी , खांब खांब या खेळांमध्ये रमून जायचो . शाळा भरण्यापूर्वी शारीरिक शिक्षणाच्या तासाला , मधल्या सुट्टीत सभागृहात सभागृहात जमलेला मेळावा अजूनही आठवतो .

मैदानावरची मजा , घटना , काही क्षण प्रसंगी दुखवायचे पण आता त्याचे फारसे गांभिर्य वाटत नाही . सानप सर दररोज शेवटचा अर्धा तास खाली खेळायला घेऊन जायचे आणि त्याच वेळी संतोष काका मैदानावर पाणी मारायचे मग ओल्या मातीच्या वासात खेळ कुठेतरी हरवून जायचे आणि मातीच्या पणत्या घडवायला जोम यायचा . पणत्या बनविण्यापर्यंत ठीक होते पण कदाचित प्रत्येक गोष्ट आकाशात कशी दिसेल हे निरखून पाहण्याच्या आमच्या कुतूहलामुळेच एक हास्यास्पद घटना घडली , पानाती बनवून उडवत असताना त्यातील एक पणती त्यावेळी मुख्याध्यापक असलेल्या खामकर सरांच्या डोक्यावर विराजमान झाली . आता हसू येतंय पण तेव्हा श्रीमुखात भडकावल्यामुळे रडू आलेलं .

पूर्वी मैदानात असलेल्या झाडाच्या बदामाप्रमाणे स्वैर , जमिनीवर बागडणाऱ्या बिया , दयानोसोर डायनोसोरची अंडी म्हणून प्रसिद्ध होत्या . या बिया काढण्याचा प्रयत्न दगड मारूनच केला जायचा सर्व मुले ती अंडी काढण्यासाठी आणि इतरांना ती मारण्यासाठी फार उत्सुक असायची . ती अंडी काढण्यासाठी असेच प्रयत्न चालू असताना एक दगड झाडाखाली उभ्या असलेल्या आमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका मुलाच्या डोक्यावर आदळला . त्यात तो दगड फारच टोकदार होता . आणि त्याचे टोक त्या बिचाऱ्या मुलाच्या डोक्याला लागले . तेव्हा हि गोष्ट सरांना सांगायला सुद्धा फार भीती वाटत होती . नंतर आम्हाला असे कळले कि त्या मुलाच्या डोक्यात टाके पडले . पण आता त्याची मनापासून माफी मागावीशी वाटते .

खेळ हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन करणाऱ्यांमध्ये आमचीही गणती आहे . मैदानी आणि बैठे या दोन्ही खेळांची सरमिसळ करण्यात आम्ही पटाईत आहोत . क्रिकेट . लंगडी , खो - खो , शर्यत व नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रत्येक गोष्टीला सिनेमा , सिरीयल , बाईक , अशा रम्यक वा काल्पनिक गोष्टींची जोड देण्याची आमची वृत्ती हि आम्हाला इतरांपेक्षा बहुदा अलिप्तता देते . शाळेचा वार्षिक क्रीदाम्होत्साव हा तुम्हा आम्हा विद्यार्थ्यांसाठी अत्यानंदाचा व सोबत रोमांचक भासणारा असा त्रिदिवसिय कार्यक्रम व संघवृत्ती , क्रीडाज्ञान , सामंजस्य इत्यादी नानाविध गुण आमच्यात बिंबवण्याचा उद्देश आणि या सर्वांना नेत्रादिपकतेचा अनुभव देणारे आमचे पटांगण , आमच्या शालेय जीवनाचे मोरपीस फुलवण्याचे कारण मला वाटते

फक्त नृत्यगुण संपन्न मुलांना सहभागी करून आपल्या क्षमतेची , कौशल्याची , मेहनतीची वाहवा कराणा-या शाळांमध्ये आमची शाळा अपवाद होती . संपूर्ण वर्गालाच नृत्यागुण संपन्न करण्याची उर्मी , इच्छा , महत्वाकांक्षा बाळगून , सर्व रत्नांना एकत्र आणून हि-याप्रमाणे काही पैलुंनीच चाकाकीत करणारी शाळा हि खरचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. नृत्य फार फार तर व्यावासायीक्तेपेक्षा समाधानाकडे कलंडले असल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न उरता तो एक बालकलाकारांच्या शून्यातून लाखाकडे वळण्यातच जमा होतो .

विनोद म्हटला तर तो कधीही , कुठेही , कसाही होतो पण विनोदातली निरागसता हि अशा काही प्रसंगांनी व्यक्त होते आणि असे प्रसंग जीवनातल्या अखेरच्या 'playback' मध्ये नक्कीच जोडले जातात. आमची अशी एक मजा ऐकलीत ना तर हि निरागसता तुम्हाला उमगेल . पहिलीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात , मुलाच्या कौतुकापोटी पुढे येउन फोटो काढून बहुदा फोटोत आठवणी साठवू ईच्छिणा-या आपल्या आईकडे नृत्य सोडून स्वतःची फोटोजनिक छाप दाखवू ईच्छिणारा महेश आज आम्हाला आठवला कि हास्यकट्टादेखील अपुरा पडल्यासारखा वाटतो .

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या 'वार्षिक स्नेहसंमेलन' या मुकुटाला अनेक कार्यक्रमांची रात्नरुपी जोडही होती . दहीहंडी , दांडिया या उत्सवात जल्लोषपूर्ण सहभाग घेणारे आम्ही आणि आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचे शिक्षक हे आठवणींचे धागेदोरे शोधणारे आम्ही या गतिमान जीवनात अगतिकच होतो .

वार्षिक कार्यक्रमात शाळेच्या अद्वितीय शिस्तीची पोचपावती देणारा आमचा मार्चपास आणि १-२-१ च्या तालावर अंशतः का होईना आपल्या जवानांचे तडफदार व्यक्तिमत्व आणि कष्टपूर्ण जीवन जाणून घ्यायचा आमचा प्रयत्न आज खूप हेवा वाटणारा वाटतो या शिस्तबद्ध मार्चपास व त्यासोबत मानवी मनोरे असा दानाकेदार कार्यक्रम रचणारे आमचे उतेकर सर आणि ' एक कि गलती सब कि गलती ' असे म्हणून शिक्षा देणा-या त्यांचा दरारा अजूनही मनात आहे .

सर्व कार्यक्रमांसोबत अभ्यासातही आम्ही काही कमी नव्हतो म्हणजे कदाचित अष्टपैलुता आमच्यात या शालेय जीवनातच रुजली . चौथीच्या स्कोलरशिपच्या परीक्षेत दणदणीत अभ्यास करून घेणारे आमचे शिक्षक आजही आठवतात स्कोलरशिपच्या तयारीसाठी घेतलेल्या वर्गामध्ये गमतीजमती काही कमी नव्हत्या . आम्हाला गणित शिकवायला सानप सर बुद्धिमत्तेला राणे बाई आणि मराठी-समाजशास्त्राला शैला बाई होत्या . शैला बाईंच्या पहिल्या तासाच्या आठवणी आज हसवतात पण तेव्हा काही वेगळ्या वाटायच्या . पहिल्या तासाला येउन , आमच्या जागा ठरवून देऊन संपूर्ण वर्गात शिस्तीची लाट पसरविणा-या आमच्या शैला बाई आणि त्यायोगे वर्षभर जागेसाठी भांडणारे आम्ही हे बहुदा लोकसभेतल्या जागा ईच्छिणा-या नेत्यांसारखेच भांडायचो . असा हसत ,खेळत ,शिकत आमच्या सगळ्या परीक्षा झाल्या व प्राथमिक जीवनाच्या समाप्तीची जाणिव करून देणारा कार्यक्रम तोंडावर आला अर्थातच तो म्हणजे निरोप समारंभ .

हा निरोप समारंभ होता आमच्या प्राथमिक जीवनाच्या समाप्तीचा . प्राथमिक मधून पूर्व माध्यमिकमध्ये होणा-या स्थित्यंतराचा आणि चार वर्ष सर्व विषयांना एकच शिक्षक असल्यामुळे त्यांच्याशी झालेल्या अतूट संबंधांची ताटातूट होण्याचा क्षण .... त्यावेळी भाषण , गीत व खाऊ या त्रिसूत्रीत साजरा केलेला तो निरोप समारंभ आज डोळ्यांत पाणी आणतो.

१ ते ४ थी सगळ्या विषयांना एकच शिक्षक होते.त्यामुळे १ ते ४ थीच्या प्रत्येक शिक्षकाशी वेगळेच नाते निर्माण झाले होते .जेव्हा आम्ही प्राथमिक मधून पूर्व माध्यमिक मध्ये प्रवेश केला तेव्हा सगळेच बदलले .पूर्व माध्यमिक मध्ये आल्यावर प्राथमिक सारखे प्रत्येक विषयाला एकच शिक्षक नसल्यामुळे प्रत्येकच शिक्षकाशी चांगले नाते निर्माण झाले .त्याचप्रमाणे प्राथमिक मधून पूर्व माध्यमिक मध्ये येताना मित्र&मैत्रिणींशी ताटातूट झाल्याने दुखःहीझाले. त्यामुळे मुले ग्रीष्म , शरद , हेमंत , वसंत अशा तुकड्यामध्ये विभागली गेली .

५ वी मध्ये नवीन वर्ग ,नवीन मित्र, नवीन शिक्षक सर्व काही नवीन असूनही जुन्याचीही सोबत होती . जुने मित्रही वर्गात होते.५ वी पासून एक नवा टप्पा सुरु झाला.

५ वीला आम्हाला वर्गशिक्षक लांघीबाई होत्या .त्या आम्हाला इंग्रजी विषय शिकवायच्या . तेव्हा आम्हाला इंग्रजी व हिंदी हे विषय नवीन होते .परंतु लांघी बाईंच्या उत्तम इंग्रजी शिकवण्यामुळे आमची इंग्रजीतली थोडीशी भीती कमी झाली व इंग्रजी माध्यम हे ‘वाघिणीचे दुध’ असल्याचे आम्हाला वाटत होते .परंतु लांघी बाईंच्या शिकवण्यामुळे इंग्रजी भाषा ही आधी एक खडकांची वाटहोती. परंतु लांघी बाईंच्या मार्गदर्शनामुळे ती भाषा एक हायवे बनली.हिंदी विषयाला कोळी बाई होत्या . समाजशास्त्र विषयाला नीला शिंदे बाई शिकवायच्या .

त्यांच्या उत्तम व रंगवून शिकवण्यामुळे या विषयात आवड निर्माण झाली.विज्ञान या विषयाला राठोड बाई शिकवायच्या.त्या अतिशय शिस्तप्रिय होत्या. परिपाठाला आम्हला नीला शिंदे बाई , साळुंके बाई होत्या. त्या आमच्याकडून परीपाठाची विविध गीते म्हणवून घेत.त्यातली काही गीते म्हणजे ‘कृष्ण गोविंद गोपाल गाते चले’, ‘नाम सदा बोलावे’, ‘आम्ही बिघडलो’.ती आम्ही मोठ्या उत्साहाने व आवडीने म्हणायचो .

५ वीला बाहेरून बसलेल्या गणिताच्या परीक्षेचे तीन टप्पे म्हणजे गणित संबोध , गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा . त्यात अधीश जुवेकर याचा गणित संबोध या परीक्षेत ठाण्यातून दुसरा क्रमांक आला.सौरभ रामाणे याने गणित प्राविण्य या परीक्षेत रौप्य पदक मिळवले .५ वीला सहामही परीक्षेत आम्ही पहिल्यांदाच ८०मार्कांच्या पेपर लिहिला.त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती.पण परीक्षा चांगल्या प्रकारे पार पडली.

नंतर दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेचा सुवर्ण टप्पा म्हणजे स्नेहसंमेलन व क्रीडामहोत्सवास प्रारंभ झाला.त्यातच आमची अनोळखी मुलांशी ओळख होण्यास सुरुवात झाली.स्नेहसंमेलनाच्या वेळी आम्हाला मंगळागौरीचे गाणे होते.सर्व मुलींनी चांगले नृत्य सादर केले.स्नेहसंमेलन अशाप्रकारे उत्तम प्रकारे पार पडले. आम्हाला, सर्वच वर्गांना मजा आली . स्नेहसंमेलनाच्या आठवणीतून बाहेर पडतो ना पडतो क्रीडामहोत्सव जवळ आला .सांघिक खेळात लंगाडीचा समावेश होता . त्यामुळे लंगडीचा संघ तयार झाला .त्या खेळाचा अंतिम निर्णय म्हणजे आमच्या ग्रीष्म वर्गातील मुले व मुली या दोन्ही संघाने विजय प्राप्त केला आणि त्यातूनच एक विधान तयार झाले. ते म्हणजे 'जिंकून जिंकून जिंकणार कोण पाचवी ग्रीष्म शिवाय आहेच कोण !!! परंतु त्या वाक्यात प्रत्येक वर्षी बदल व्हायचा तो म्हणजे इयत्तांचा.

आम्हाला ग्रुप प्रोजेक्टही करायचा होता.या प्रोजेक्टमुळे आमच्यातली मैत्री अजूनच वाढत गेली.ग्रुप प्रोजेक्ट साठी आम्ही 'सूर्यमाला' हा विषय निवडला होता.या प्रोजेक्टचे काम आम्ही मितालीच्या घरी केले होते. तस म्हणाव तर आम्ही प्रोजेक्ट कमी आणि खेळलोच जास्त!!त्यात सुमेधाव तिच्या आईनेच अर्ध्याहून अधिक प्रोजेक्ट केला होता.पण प्रोजेक्टची माहिती मिळवण्यासाठी आम्ही अनेक पुस्तके चाळली.जेव्हा तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि आम्ही तो शिक्षकांना दाखवला तेव्हा त्यांनीही आमचे खूप कौतुक केले.

जानेवारीत लवकरच सहल जाणार यामुळे सर्वजण खुश होते.पाचवीला आमची सहल वज्रेश्वरी ला गेली होती.बसमधून जाताना सर्वांनी खूप धम्माल केली होती.मुल गाण्याच्या भेंड्या खेळले. तिथे गेल्यावरही सर्वांनी खूप मजा केली. सहलीमुळे सार्वजन अजूनच एकमेकांना ओळखू लागले. दिवाळीच्या सुट्टीनंतर सुजान पाटील सरांचा प्रवेश झाला . ते नवीन असले तरी त्यांच्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली आणि आमच्या आवडत्या शिक्षकांपैकी एक बनले .आम्ही सरांच्या तासाला खूप मजा करायचो.अशाप्रकारे सर्वांची ओळख करून घेण्यातच आमचे पाचवीचे वर्ष संपले.आणि पहिल्यांदा वर्गात प्रवेश करताना थोडीशी भीती वाटणारा हा वर्ग आता आपलासा वाटू लागला होता.

पाचवीच वर्ष अगदी आनंदात सरलं हे वर्ष आमच्यासाठी अगदी नाविन्याचं , अनुभवी, उत्साही होतं . शालेय आठवणींमध्ये पाचवीचं वर्ष आमच्यासाठी होता सोनेरी पान होत. आणि याच सोनेरी पानाला चकाकी देत सहावीचं वर्ष उजळलं.

आम्हाला सौ. सरोज मुकणे या वर्गशिक्षिका म्हणून आल्या. त्यांनी आम्हाला प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक कठीण प्रसंगात आधाराचा, मदतीचा हात दिला शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आम्हाला त्यांच्या शिकवायच्या पद्धती, शिस्त सांगितली. काही आवली मुलांना त्यांनी पुढच्या बाकावरच बसविला होतं.

वर्गातले सारे आता एका family सारखे होते, सुजन सर, राठोड बाई ,म्हात्रे सर ,मोरे सर, शेवाळे बाई, टेंबे बाई हे सारे शिक्षक होते.

म्हात्रे सर आम्हाला शारीरिक शिक्षण ला होते.शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मैदानावर खेळण्याचा आकर्षण असतं. तर त्याला आम्ही कसे अपवाद असणार !!!! म्हात्रे सरांचा तास असला कि सारं आवरून सगळे खाली खेळायला जायला उत्सुक असायचे.काही खेळायचे तर काहींचा कट्ट्यावर गप्पांचा फड रंगायचा .आम्ही सगळे मैदानात लापाछुपी खेळायचो, आत्ता एवढ्या मोठ्या मैदानात लापाछुपी म्हणजे हास्यास्पदच आहे. आहे पण जे अशक्य आहे ते शक्य करायचा हेचतर ग्रीष्म वर्गाचं ब्रीद वाक्य आहे न !!! झाडांच्या मागे एका कट्ट्यावर कोपऱ्यात लपायचं.

..........

मैदानावरच्या आठवणी आहेत. आमची म्हणजे आमच्यासाठी समुद्र हे भाव विश्व, आमची आई, मैत्रिण म्हणजे शाळा आणि या शाळेच्या मैदानातले अनुभव किनाऱ्यावरच्या वाळूतले प्रत्येक वाळूच्या कणासारखे आहेत.

प्रत्येकाच्या आठवणिच्या गाठोड्यात मैदानातील आठवणी या ठळक आणि सोनेरी असतील. आठवड्यातून दोनदा येणारा शारीरिक शिक्षणाचा तास आमच्यासाठी महिन्यातून दोनदा येणाऱ्या पोर्णिमेसारखं असे. प्रत्येकाच्या आवडीचा तास. या तासाला मनसोक्त खेळायचं, हुंदडायचं ,बागडायचं. या तासाला वयाचं,अभ्यासाचं , कशा कशाचच बंधन नव्हतं. बंधन होत ते फक्त वेळेचं..........खेळ म्हटल तर शारीरिक शिक्षण नंतर दुसरं नाव येत ते समाज शास्त्राच्या तासाचं.कारण आमचे सगळ्यांचे आवडते सुजान पाटील सर आम्हाला नेहमी हसत खेळत इतिहासभूगोल इतिहास, भूगोल शिकवायचे. कधी तसच कंटाळा आला कि वर्गात 'शिवाजी म्हणतो...........' म्हणतो सारखे खेळ खेळायचे , तेही मैदानावर ........ कधी गाण्यांची मैफिल तर कधी ऐतिहासिक चर्चा. सारं अगदी मनापासून आवडणारं . गाणं म्हटला तर काही ठराविक मंडळी पुढे जाऊन गाणं म्हणायची.

तास आमच्यासाठी गमतीचा असायचा. संचिता,दामिनि , तन्वी आणि पूजा यांचा एक ग्रुप होता. हा ग्रुप नेहमी डबा खायला एकत्र, तास डबे खायचेसगळे.

एकदा चित्रकलेच्या तासाला सर वर्गात आले होते . सगळ्यांच्या वह्या तपासणार होते, काही जणांनी सरांच्या खुर्चीला वेढाघातलेला तर काही जणांचा पोरखेळ चालू होता.काहींनी गप्पांनी मैफिल सजवलेली.

सहावीमध्ये आम्ही प्रवेश केला खरा परंतु पूर्ण मिक्स होऊ शकलो नाही- परंतु जसे आम्ही ७वी मध्ये प्रवेश केला आणि सारं चित्रच बदलून गेल. आमच्या शाळेत विविध उपक्रमांमध्ये आम्ही असे काही अडकलो कि बस अडकलो म्हणजे जखडलो गेलो नाही आनंदाने व स्वखुशीने एका रेशमी धाग्यात गुंडाळले गेलो.

 पाचवीला शाळेत मे महिन्याची सुट्टी येण्याची आम्ही वाट बघायचो, मात्र सातवीत जवळजवळ सर्ववर्ग मित्रत्वाच्या नात्यात एकरूपलो आणि सुरु झाले एक अविस्मरणीय पर्व ........

१५ जूनचा दिवस उगवला त्या दिवसाची आम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो कि, तो दिवस कधी उगवला हे समजलेच नाही. संगम पाटील सर हे आमचे सातवीचे वर्गशिक्षक होते, ते आम्हाला गणित हा विषय शिकवायचे, ते अतिशय गमतीशीर शिकवायचे. सातवीत गेल्यावर आमच्या मस्त्याही वाढल्या. इतरवर्गांशी मारामा-या होऊ लागल्या, परंतु आमच्या वर्गातील शुभम भोसले हा अतिशय धष्टपुष्ट असल्याने आमच्या वर्गातील कोणत्याही मुलाला मारण्यास इतर वर्गातील मुलांचे हातधजावत नसत.

आम्हाला शनिवारी पार्ले बिस्कीट मिळायचे , परंतु कोणाचीही खाण्याची इच्छा होत नसे. असच एकदा आम्हला बिस्कीट दिले होते आणि मनाली व प्राजक्ता या वर्गातल्या हुशार मुली होत्या.सर्व मुलांनी त्यांच्या बाकावर बिस्कीट ठेऊन दिली. पणत्यांनी शिक्षकांना नाव सांगितल्यामुळे आम्हाला छड्याही खाव्या लागल्या. 

सातवीला सुजान पाटीलसरआम्हालासमाजशास्त्रशिकवीत. त्यांनी समाजशास्त्र हा विषय इतका खोल वर शिकावीला कि, तो आमच्या कायमचाच स्मरणात राहिला. त्यांचा तास कधीही संपू नये असे आम्हाला नेहमी वाटत. पण कधी कंटाळा आला तर ते आम्हाला मैदानावर सोडायचे , वर्गात दमशराज खेळायचे, कधीकोण मस्ती करेल तर  ते 'पाणीभरणे'  हा खेळखेळून त्यांचे हातही खूप लाल करायचे, पण खूप मजाही यायची. तसेच कधी कधी ते दप्तर हातात घेऊन उभे राहायला सांगत. तेव्हा सर्व मुले दप्तरातील वह्या पुस्तके बाहेर काढून ठेवत आणि दप्तर घेऊन उभे राहत.तेव्हा खूप मजा यायची. सरांच्या शिक्षा या खूप मजेदार असायच्या. 

आम्हाला हिंदी विषयाला मुकणे बाई होत्या.त्यांनी आमच्या कडून वेगवगळे उपक्रम करवून घेतले.त्यांनी आम्हाला सलाड बनवायला सांगितले होते.प्रत्येक रांगेने एक एक दिवस सलाड बनवून आणायच्या व त्यातील काही सलाड शिक्षकांना द्यायचा अस बाईंनी सुचवले होते.सर्वजण ठरवल्याप्रमाणे सलाड आणत.त्यामुळेआम्ही सर्वजण मधल्या सुट्टीची आतुरतेने वात पाहत. आम्ही सर्वांनी मस्त सलाड आणलेला व तो मिळून मिसळून खाल्ला .परंतु यात असे काही जन पण होते ज्यांनी फक्त खाण्याचेच काम केले होते....बनवून तर काहीच आणले नाही. याप्रमाणेच अजून उपक्रम दिले होते जसे कि शाळा बनवणे , स्वतः वही तयार करणे, टेबल क्लोथ . शाळा बनवण्याचा उपक्रम सगळ्यांनाच आवडला होता .वर्गात आशुतोष शिंदे याने हुबेहूब शाळा तयार केली होती.सगळ्याच मुलांनी चांगले प्रयत्न केले. टेबल क्लोथ पण सर्वांनी बनवला होता . पण वही बनवायला जवळ जवळ सगळ्यांनीच कंटाळा केला .कारण वही स्वतः हाताने शिवून बनवायची होती. यासाठी काहींनी आईकडून वही तयार करून घेतली तर काहींनी चक्क दुकानातून कोरी वही  खरेदी करून आणली आणि ती बाईंना दिली. पण हे सर्व उपक्रम करताना खूप मजा आली.

श्रावणीशुक्रवारीआमच्यावर्गानेनाटकबसविलेहोते.आम्हालाआमच्या वर्गाने कॉलेज मधील जीवन कसे असते यावर नाटक सादर केले होते.ते नाटक सर्व मुलांना आवडले.परंतु नंतर आमची संगम पाटील सरांनी त्यांना हे नाटक खूप आवडल नाही असे सांगितले तेव्हा मनाला थोडस खटकल. चित्रपट बघायला खूप मजा यायची.सगळे एकत्र असल्यामुळे एखादा विनोदी प्रसंग आला कि सर्वजण हसत हसत त्याचा आनंद घेत. शाळेत 'सलामबच्चे ' हाचित्रपटदाखविलाहोता.

सातवीला अधीश जुवेकर हा स्कॉलरशिपच्या परीक्षेत विभागातून ५६वा आला होता. तेव्हा त्याने आमच्या शाळेचे नाव उंचावले होते. आठविला 'पर्यावरण' हा विषय येणार असल्यामुळे आम्हाला गडकरीमध्ये नेऊन पर्यावरणाचे चित्रपट दाखविण्यात आले होते.  तेथे आम्हाला गांडूळखतावर माहिती मिळाली. 

७वीतील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे या संस्थेने विज्ञानावर आधारित प्रकल्पस्पर्धा आयोजित केली होती. हा प्रकल्प करण्यासाठी आमच्या टेंबे मॅमनी आमच्यातीलच ५ जणांची निवड केली.हा प्रकल्प औदुंबर या वृक्षावर करण्याची संकल्पना त्या मुलांना टेंबे मॅमनी सुचवली.त्या मुलांनाही हा विषय प्रचंड आवडला. या प्रकल्पासाठी सुक्ष्मनिरीक्षण आणि संशोधनाची गरज होती.त्या मुलांनीसुद्धा या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली.या प्रकल्पाचे नाव होते -' औदुंबर -एक परिपूर्ण जैवविविधता.' या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या मुलांना जोशी-बेडेकर या महाविद्यालयात जाण्याची संधी मिळाली.तेथील शिक्षकांनी त्या मुलांना आवश्यक ते सहकार्यसुद्धादिले.त्यानंतर त्या मुलांनी तो प्रकल्प जिज्ञासा ट्रस्ट या संस्थेच्या कार्यालयात सादर केला.हा प्रकल्प विभाग पातळीत निवडला गेला.त्यानंतर हा प्रकल्प जिल्हा पातळीवर सादर करण्यासाठी त्या मुलांमधील तीन जण वाडा या तालुक्यातील एका शाळेत गेले होते.

दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा वार्षिक क्रीडामहोत्सव व  स्नेहसंमेलन याची तयारी सुरु झाली. हे आमचे पूर्व माध्यमिक मधील शेवटचे वर्ष होते. स्नेहसंमेलनात काहीमुलांची कोळी गीत तर काही मुलांची शिवाजी महाराजांच्या गाण्यात निवड झाली. या नृत्यात मुलांचाही सहभाग होता.सादर केलेले नृत्य सर्वांनाच आवडले.  क्रीडामहोत्सवात  सातवीलालंगडी असायचीच, शिवाय खो-खोसुद्धा असायचं. या वेळी शेवटच वर्ष आहे.. सगळ्यांनी जिंकायचं असाच सर्वांच्या मनात होत. खो-खो हा खेळ आम्हाला तेव्हा नवीन होता त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती.  पण सातवीलासुद्धा आम्ही दोनही खेळामध्ये  विजयप्राप्त केला होता. खरे म्हणजे आम्ही पाचवी, सहावी व सातवीत लंगडीमध्ये जिंकून रेकॉर्ड मोडला होता. हे तीनही वर्ष मुला व मुलीनी विजय प्राप्त केला होता. याच्या खुशीत आम्ही संपूर्ण शाळेत नाचत, गात, जल्लोषात ,आनंदसाजराकरीत फिरत होतो.  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही सहलीसाठी आतुर होतो परंतु त्या वर्षी शाळेची सहल गेलीच नाही. त्यामुळे आम्ही सगळे दु;खी होतो. पण आम्ही वर्गात काही कमी मजा केली नव्हती! परीक्षा जवळ आली तर शिक्षक खाली खेळायला सोडत नसत.तेव्हा आम्ही वर्गातच दमाशराज खेळायचो.यात एक मुलांची व एक मुलींची टीम असायची.सर्वजण खेळात सामील व्हायचे.खूप मजा यायची आणि त्याचबरोबर भांडणही व्हायची.  असच हसत खेळत आमची परीक्षा जवळ आली आणि पूर्व माध्यमिकचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले.सर्वजण पुढील इयत्तेत जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्याचवेळी थोडीशी मनात भीतीही होती. ती अशी कि माध्यमिक मध्ये शिक्षक कसे असतील , कठोर असतील का? खूप मारत असतील का?अशाप्रकारे आम्ही अनेक अनुभव घेत ८ वीत प्रवेश केला.

शाळा हे अविस्मरणीय पर्व प्रत्येकाच्या आयुष्यात येत आणि आल्यावर त्याच्या आंबट - गोड आठवणी हृदयाच्या एका कोपऱ्यात सुवर्णाक्षरात कोरून जात....! असेच आंबट - गोड अनुभव आम्हीही अनुभवत होतो..... गोष्टींच्या पुस्तकात रमत होतो...मित्र - मैत्रिणींबरोबर रुसवे फुगवे करत होतो....! हे सगळं सुरळीत सुरु होतं, बालपण हसत - खेळत अनुभवत होतो ,पण याच दरम्यान आमच्या आयुष्याने एक वेगळा वळण घेतलं आणि आमच्या विश्वातलं एक नवीन पर्व सुरु झालं.... आणि ते पर्व म्हणजे आमचा 'पूर्व माध्यमिक'मधून ' शिव समर्थ विद्यालया ' च्या माध्यमिक विभागातला प्रवेश... आणि या पर्वातील प्रत्येक दिवस आमच्या साठी अविस्मरणीय ठरला!  खरतर आमचे काही मित्र - मैत्रिणी या शाळेत बालवाडीपासून आहेत आणि त्यामुळे त्यांचे या शाळेशी जिव्हाळ्याचे नाते आहेच. त्यांची या शाळेशी नाळ लहानपणापासूनच जोडली गेली. परंतु वेगवेगळ्याटप्प्यात विविध रंग या इंद्रधनुष्यात मिसळत गेले. या तीन वर्षांत आम्हाला अनेक चित्रविचित्र अनुभव आले... अतिशय टेंशन फ्री असं आमचं ८वी च वर्ष होत....आम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये गुंतवणार...आणि निरनिराळे अनुभव देणार होत आमचं ९वी च वर्ष....आणि अभ्यासाच्या दडपणाबरोबरच फुल टू धम्माल आणणार होत आमचं १०वी च वर्ष..... !!! ८वीतला पहिला-पहिला अनुभवलेला इव्हेंट म्हणजे जिज्ञासा.मराठी भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे... इतरांशी संवाद कसा साधावा त्याचप्रमाणे वक्तृत्व कला विकसित कशी करावी याबद्दलचा चांगला अनुभव आम्हाला जिज्ञासामुळे मिळाला आणि यासाठी आम्हाला श्री. मांजरेकर सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.मासिकसंपादन करण्याची आगळी वेगळी कलाही अवगत झाली. त्यामुळे आमच्या लेखन कौशल्याला , कल्पनाशक्तीला चालना मिळाली. ग्रंथालीने मो. ह. विद्यालयात ऑगस्ट महिन्यात पुस्तक प्रदर्शन भरवले होते.त्या पुस्तक प्रदर्शनाचा आस्वाद घेता आला.तेथे आम्ही 'ठाणे तिथे काय उणे ' या विषयावर एक नाटिका सादर केली. त्यातून ठाण्यातील विविधांगी वैशिष्टे आणि इतिहास आम्ही जाणून इतरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.हा खरोखरच आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.....!!  सत्कार रेसिडेन्सीचा अनुभव कायम स्मरणात राहील असा होता....! रोटरी क्लबने २००९-१० च्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नरच्या स्वागतासाठी सत्कार रेसिडेन्सी येथे कार्यक्रम आयोजित केला होता.या स्वागत समारंभात आम्ही इंटरेक्टर्सनि मराठमोळ्या वेशात लेझीम सादर केलं आणि त्या लेझीमचा मनमुराद आनंद लुटला.८वीच्या वर्षातील स्मरणात राहिलेली गोष्ट म्हणजे आम्ही केलेल्या कानगोष्टी आणि खेळलेले दमशेराज ! तेव्हा काय काय चित्रपटांची नावे शोधली होती आम्ही…!!! ८वीत आलेला आंबट अनुभव म्हणजे बदललेली शिक्षण पद्धती! ह्या बदललेल्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गुणांचे मूल्यमापन लेखी परिक्षांऐवजी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून केले जाणार होते .यामुळे पाठ्यपुस्तकांबाहेरील ज्ञान आम्ही ग्रहण केले. पुस्तकाबाहेरचे विषय हाताळून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करून बाह्य परीक्षांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे हा या मागचा हेतू होता. हा चांगला अनुभव आम्हांस आला.परंतू ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या उपक्रमाची दुसरी विपरीत बाजू काही दिवसांतच विद्यार्थांवर दिसून आली.त्यामुळे मुलांचे अभासाकडे दुर्लक्ष होऊ लागले.८वीच्या वर्षात याचे सुख अनुभवता आले.परंतु त्यामुळे ९वीच्या सुरुवातीला आभासाचे थोडे ओझे वाटू लागले. यातून निष्कर्ष काढायचा म्हटला तर या मागचा मुळ हेतू साध्य न होण्याचे कारण म्हणजे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील दुरावत गेलेला सुसंवाद! परंतु या कचाट्यातून आमची लवकर सुटका झाली, त्यामुळे आम्ही आम्हाला सुदैवी मानतो….या सर्वात ८वी च वर्ष केव्हा सरल ते कळलच नाही… ८वीच्या वार्षिक परीक्षेनंतर आम्ही एकदम जोशात वाट पाहत होतो ती ९वीच्या वर्षाची... आणि काही दिवसांतच हे वर्ष सुरु झाल आणि आमच्या साठी घेऊन आल धमाल, मस्ती, मज्जा आणि अभ्यास ..........!  या ९वी च्या नवरंगी वर्षाच्या सुरुवातीलाच दहा दिशांतून सात आश्चर्य एकत्र आली आणि आमचा १७ जणांचा, सर्वांसाठी ' खतरा ' असलेला एक मस्त group तयार झाला आणि आमच्यातल्या ह्या १७ व्यक्ती म्हणजे -एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेली प्राजक्ता .एक सोजवळ व्यक्तिमत्त्व म्हणजे मिताली.आमचे सगळे events manage करणारा event manager महेश .Our little scientist जुवेकर साहेब (Adheesh). आमच्यातील संमिश्र व्यक्तिमत्त्व म्हणजे मयुरी .Our book worm मनाली ( Manu ).आमच्या ग्रोउप मधील सगळ्यांना समजून घेणारी व्यक्ती म्हणजे संचिता ( Sanchi ).आमच्या सगळ्यांचं entertainment करणारी pink doll म्हणजे श्वेता ( Pinky ).आमच्यातील अंतर्मुख व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिकेत .आमच्यातील chocolate boy म्हणजे करुणेश . आमच्या group मधील young hacker म्हणजे सौरभ .आमच्यातील smart girl - प्रियंका ( Piyu ).सगळीकडे debate करणारी भाग्यश्री (Bhagu ).आमच्यातील स्पष्टोक्ते व्यक्तिमत्त्व - तन्वी ( Tanu ).संवाद कौशल्यात हातखंडा असलेली - भैरवी ( Bhai ).The dancer आणि sporty boy - गौरव ( Gaurav ). काय धमाल केली ना आपल्या या group ने ! अगदी आय.आय.टी.च्या टेकफेस्ट पासून ते गिनिज बुकातल्या राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमापर्यन्त…! ९वी म्हणजे फुल ऑन धमालच होती ! ! ! हं , ते आठवतय का ?? आय.आय.टी. च टेकफेस्ट तिथलं water zobbing.....रोबोट्स ....संरक्षण दलाचे प्रदर्शन.... तिथली व्याख्यानं.... मिनी कार रेसिंग.... आय.आय.टी.चं मिनी मोडेल .... Ice-cream च्या काड्यांपासून बनवलेले bridges.... पवई तलाव.... विविध वैज्ञानिक प्रकल्प........ आणि अशा बऱ्याच गोष्टी अनुभवायला किती मजा आली होती ना !यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला इतके विविध अनुभव आले की ते सर्व शब्दांत व्यक्तच करता येणार नाहीत !  याच दरम्यान ‘शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येणार आहे’, यासंबधी D.A.V. विद्यालयाचे पत्रक आले आणि त्या प्रदर्शनासाठी आमच्या शाळेतील भाग्यश्री, प्रियंका, तन्वी यांनी 'Trombe wall' व महेश, अधीश, अनिकेत यांनी 'Eco- -friendly building' हे दोन प्रोजेक्ट तयार केले. सहामाही तोंडावर आली असल्यामुळे या प्रदर्शनात भाग घ्यायचा कि नाही या द्विधा मनस्थितीत आम्ही होतो.पण अभ्यासापेक्षा हा अनुभव जास्त अविस्मरणीय असत, हे त्यावेळेला आम्हाला समजले म्हणून आम्ही ह्या मध्ये भाग घेतला.हा प्रोजेक्ट आम्हाला फार काही देऊन गेला.साऱ्या Convent School मध्ये आमची एकच सेमी इंग्लिशची शाळा होती.खरेतर येणाऱ्या डायरेक्टर ‘Steven Rudolph' यांच्या समोर विषय मांडताना थोडी भीती वाटली मात्र आम्हीही दणकून तयारी केली होती.यासाठी आम्हाला शाळेने खूप प्रोत्साहन दिले.हि दोन्ही मॉडेल्स शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या प्रोजेक्टच्या वेडातून बाहेर येतो ना येतो तोच एक अनोखा योग जुळून आला.माटुंगा येथील रुपारेल कॉलेज मध्ये अमित्वा भट्टाचार्य यांचे खगोल शास्त्रावरील व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. I.I.T. मधून पद्वित्तर झालेल्या अमित्वा भट्टाचार्य यांचे व्याख्यान खरोखरच खूप Intresting होत. आणि पाठ्यपुस्तका बाहेरील नवीन ज्ञान मिळवण्याचा आनंद यातून आम्हाला घेत आला. नोहेंबरच्या सुरुवातीला मुंबईच्या 'Robo Champ' ने आमच्या शाळेत ' IQ Test' घेतली.आणि त्यात आश्चर्यकारकरित्या तीन विद्यार्थी Select झाले.आम्हाला त्यांच्या मार्गदर्शना खाली एक रोबो बनवायचा होता.अर्थात 'Humanoid' नसला तरी साधा 'Baski - Robo' च होता तो.आमच्यासाठी तो प्रथम अनुभव होता. वेगवेळ्या अडचणीचा सामना करत आम्ही हा प्रोजेक्ट हि यशस्वी केला अन शाळेच्या विज्ञान प्रदर्शनातही ठेवला!!! आजकाल डिसेंबर आला कि आम्हाला वेगळेच वेध लागायला लागतात. ते म्हणजे आमचे लाडके डॉं. काका आनंद नाडकर्णी यांच्या वेधचे!!! वेध- एक अविस्मरणीय अनुभव! कोणत्याही रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असा हा वेधक अनुभव.भारत आणि भारताबाहेरील अनेक अनोख्या व्याक्तीमत्वाना वेधच्या व्यासपीठावर बोलताना पाहिले की सारे अप्रूप वाटले, किती मोठी संधी आपल्याला मिळाली.येणाऱ्या त्या व्यक्तींची वाक्य तर मनात फार खोलवर रुजली आहेत. डॉं.राजन बडवे म्हणाले होते ' मला सगळ येत ' अश्या दृष्टीकोनातून शिक्षक बोलू लागला की तिथे मुलांची जिज्ञासा खुंटते.नितीन चंद्रकांत देसाई यांच ' वेडी माणस च स्वप्न बघू शकतात...स्वप्न बघितले तरच ते पूर्ण होण्याचा मार्ग सापडतो ’.संस्कृत पी.एच.डी.असलेल्या रुप कुलकर्णी यांनीतर फार महत्वाचा संदेश दिला. ‘कोणतही Statement आधारा शिवाय नये.' अस्वस्थता Creative असते.’ ह्या फार मोलाच्या गोष्टी कळल्या. वेधच्या बऱ्याच आठवणी आहेत. वर्गातील शिक्षकांपेकी हि फारच कमी जण वेधला उपस्थित होते. पण जे उपस्थित होते त्यांनी मनमुराद आनंद लुटला हे नक्की!!! वेधची अर्थपूर्ण गाणीहि आम्ही मनःपुर्वक अनुभवली. सहामाही झाल्या झाल्या गीतापठनाची तयारी सुरु झाली.खरेतर श्रोत्री आजींचा उत्साह पाहून आमच्यात अधिक उत्साह संचारला. त्यांच्या या स्पर्धा परीक्षांबाबतचा उत्साह म्हणजे एक Magical power आहे जणू !!! त्यांनी करून घेतलेल्या सुंदर तयारी मुळेच सरस्वती विद्यालयात जाऊन त्यांच्या विद्यार्थ्यांना हरवून आमचे दोन्हीही गात जिंकले.... जानेवारी मध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन च्या मार्फत आमच्या ९ वी ग्रीष्मच्या वर्गाला विलेपार्ले येथील पार्ले कंपनीत नेण्यात आले. तेथे आम्हाला पार्ले कंपनीच्या कार्याबद्दलची माहिती Presentation मार्फत देण्यात आली. दुकानातून काही पैसे देऊन विकत घेत असलेले पार्ले प्रोडक्टस कितीही शुल्लक असले तरी ते तयार करण्यामागची त्यांची मेहेनत आणि प्रक्रिया जाणून घेण्याची संधी आम्हाला या सहलीमुळे मिळाली. तेथे आमच्या शाळेव्यतिरिक्त अन्य शाळांनाही ह्या संधीचा आस्वाद घेत आला.काय मज्जा आलेली ते पाहायला..............चॉकलेटस कसे तयार होतात...............त्यांची रापिंग कशी करायची.........आणि बरेच काही अनुभव आम्ही येथे अनुभवले. आपल्या देशाचे स्तुतीपर गीत असलेले राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिले.अशा सुमधुर राष्ट्रगीताचे गिनीज बुक मध्ये नोंदणी व्हावी यासाठी ठाण्यातील अनेक कंपन्यांनी प्रयत्न केला व यामध्ये आमच्या शाळेने खारीचा वाट उचलला होता.यामध्ये ठाणेकरांचा सहभाग होता.ठाण्यातील भव्य दिव्य अश्या दादोजी कोंडदेव स्टेडियमध्ये ‘ठाणे जनता सहकारी बँक’ याकडून समूह राष्ट्रगीत गायनाचे कार्यक्रम आयोजित केला होता.तिथे सर्व विद्यार्थ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.तिथे सर्व विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी अनेक celebratin चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.गिनीज बुकमध्ये होणाऱ्या नोंदणीसाठी असलेला आमचा वाटा आम्हाला एक वेगळाच आनंद देवून गेला.३० सेकंदांच्या countdown नंतर उपस्थित सर्वानी एकसुरात राष्ट्रगीत म्हटले.एवढ्या जणांच्या राष्ट्रागीतांनी संपूर्ण आसमंत देशप्रेम आणि देश्भाक्तीमध्ये न्हाऊन निघाले.  आमच ९ वी च वर्ष म्हणजे एक धमाल वर्ष होत. साऱ्या शालेय वर्षा मधला ते सर्वात उत्कृष्ट वर्ष होत अस म्हटले तरी चालेल. वास्तविक पाहता पुढच १० वी च वर्ष म्हणजे शेवटच............ तेव्हा आपण मज्जा करू शकणार नाही वैगरे गैरसमजुती आमच्या मनात होत्या. म्हणूनच आम्ही ९ वी त आपोआप प्रत्येक activity अन् event मध्ये भाग घेत गेलो.................!!!!!!!!!!!!!!!!!!!! ९ वी संपल्यानंतर मधल्या vacation मध्ये vacation enjoy करण्याचे वेध आम्हाला लागले होते. परंतु सर्व इच्छांचा चक्काचूर केला ते आमच्या vacation classes ने. ९ वी ची वार्षिक परीक्षा संपतेना संपते तोच ४ थ्या दिवशी शाळेने vacation classes cha श्री गणेश केला. आणि नंतर एक महिना vacation classes ला राम राम ठोकला आणि त्याची पुन्हा सुरवात केली ती जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच. तेव्हा पासून दर रविवारी त्या classes चा आंबट अनुभव आम्हाला घ्यावा लागत आहे.  १० वी वर्षात वाढदिवस वेग�